रिलायन्सने केल्या 'या' मोठ्या घोषणा

वृत्तसंस्था
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

रिलायन्सने आज (सोमवार) गिगा फायबर, जिओ चॅट आणि जिओ सेट टॉप बॉक्स बाजारात आणण्याची मोठी घोषणा केली.

 मुंबई : रिलायन्सने आज (सोमवार) गिगा फायबर, जिओ चॅट आणि जिओ सेट टॉप बॉक्स बाजारात आणण्याची मोठी घोषणा केली.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) कंपनीची मुंबईत आज (सोमवार) 42 वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या बैठकीत मुकेश अंबानी यांनी ही माहिती दिली. रिलायन्स जिओने गेल्या वर्षात मोठी भरारी घेतली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत रिलायन्सचे मोठे योगदान आहे. लोकाभिमुख उद्योग समूह करण्यात यश आल्याचे रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी सांगितले.

जिओ गिगाफायबर सेवा या बहुप्रतिक्षित ब्रॉडबँड सेवेबाबत कंपनीकडून गेल्या वर्षभरापासून देशात अनेक ठिकाणी जिओ गिगाफायबर सेवेची चाचणी सुरु होती. अखेर आज ती सादर करण्यात आली. या सेवेची चाचणी 5 लाख घरांत प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येणार आहे. या सेवेसाठीचे प्रतिमाह 600 रुपयांपासून प्लॅन असण्याची शक्यता आहे. यामध्ये प्लॅनमध्ये 50 mbps हायस्पीडसह 100 GB पर्यंत डेटा मिळेल. तसंच जिओ इंटरनेट टीव्ही, लँडलाईन सेवा, व्हिडीओ कॉलिंगसाठी जिओ चॅट या सेवा सुरु करण्यात आल्या. गिगाफायबरमुळे बोलणारा टीव्ही तुमच्या घरात येणार असून त्यामध्ये शेकडो फिचर असणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reliance JioGigaFiber, JioPhone 3 set for launch at RIL AGM 2019