अनिल अंबांनींना शेअर होल्डर्सनी धरले धारेवर; काय घडले? कोठे घडले?

Anil-Ambani-Reliance
Anil-Ambani-Reliance

मुंबई : दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या उद्योगपती अनिल अंबानी यांना सोमवारी (ता.30) रिलायन्स कॅपिटलमधील भागधारकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

अनिल अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स समूहाच्या बहुतांश कंपन्यांवर कर्जाचा डोंगर वाढत असून, भांडवली बाजारात कंपन्यांच्या शेअर्सची धूळधाण झाली आहे. त्यामुळे प्रचंड नुकसान झालेल्या भागधारकांनी सोमवारी वार्षिक सर्वसाधारण सभेत अंबानी यांच्यावर प्रश्‍नांचा भडिमार केला. 

रिलायन्स समूहातील रिलायन्स कॅपिटल, रिलायन्स इन्फ्रा, रिलायन्स पॉवर, रिलायन्स होम फायनान्स आणि रिलायन्स कम्युनिकेशन या पाच कंपन्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मुंबईत पार पडली. या वेळी भागधारकांनी अंबानी यांच्या नेतृत्वावर टीका केली. कंपनीची धोरणे बाजाराशी सुसंगत नसून, त्यामुळे प्रचंड नुकसान झाल्याचे टीका भागधारकांनी केली.

या वेळी अंबानी यांनी कर्जफेडीसाठी आणखी काही मालमत्ता विक्रीचा प्रस्ताव सभेपुढे सादर केला, मात्र त्यावर भागधारकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. येत्या मार्चपर्यंत रिलायन्स समूहाला 15 हजार कोटींच्या कर्जाची परतफेड करायची आहे. त्यामुळे मालमत्ता विक्रीशिवाय अंबानी यांच्याकडे पर्याय उरलेला नाही. 

रिलायन्स कॅपिटलची विक्री करणार 
कर्ज आणि विमा व्यवसायात स्थिरावलेली रिलायन्स कॅपिटल वित्त सेवेतून माघार घेणार असल्याचे अनिल अंबानी यांनी सभेत जाहीर केले. या कंपनीचे रिलायन्स कमर्शिअल फायनान्स आणि रिलायन्स होम फायनान्स या दोन्ही कंपन्या डिसेंबरअखेर व्यावसायातून माघार घेतील, असे अंबानी यांनी सांगितले.

दोन्ही व्यावसायांच्या विक्रीने 25 हजार कोटींचा निधी उभा राहील, असे अंबानी यांनी सांगितले. दोन वर्षांपूर्वी अंबानी यांनी दूरसंपर्क सेवेतील रिलायन्स कम्युनिकेशन बंद केली होती. 15 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या रिलायन्स कॅपिटलमध्ये 30 हजार कर्मचारी आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com