महागाई पासून मिळणार दिलासा, नोकरीच्याही संधी वाढणार; अर्थ मंत्रालयाचा अहवाल Finance Ministry Report | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

finance minister

महागाई पासून मिळणार दिलासा, नोकरीच्याही संधी वाढणार; अर्थ मंत्रालयाचा अहवाल

अर्थ मंत्रालयाच्या अहवालात गुरुवारी म्हटले आहे की, जागतिक आर्थिक मंदी असूनही भारत येणाऱ्या वर्षांमध्ये आर्थिक स्थिरतेमुळे वेगाने वाढ करण्यास सक्षम आहे. त्यात पुढे म्हटले आहे की, येत्या काही महिन्यांत खरीप पिकांच्या आगमनाने महागाईचा ताण कमी होईल आणि येणाऱ्या काळात नोकरीच्या संधी वाढतील.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार...

ऑक्टोबर 2022 च्या मासिक आर्थिक पुनरावलोकनाने देखील सांगितले की, अमेरिकेच्या मौद्रिक धोरणामुळे नजीकच्या भविष्यासाठी भारताला धोका आहे. यामुळे शेअरच्या किमती घसरणे, चलन कमकुवत होणे आणि रोखे उत्पन्न वाढणे यासारख्या गोष्टी होऊ शकतात. यामुळे जगभरातील अनेक सरकारांसाठी कर्ज घेण्याच्या खर्चात वाढ होऊ शकते. त्यात म्हटले आहे की, जागतिक विकासाच्या शक्यतांमध्ये उच्च चलनवाढ आणि बिघडत चाललेली आर्थिक परिस्थिती यामुळे आगामी जागतिक मंदीची भीती निर्माण झाली आहे.

जागतिक मंदीच्या भीतीमुळे भारताच्या निर्यात व्यवसायाच्या अपेक्षा कमी होऊ शकतात. तरीही लवचिक देशांतर्गत मागणी, चांगली आर्थिक व्यवस्था आणि संरचनात्मक सुधारणांसह सक्रिय गुंतवणूक चक्र आर्थिक विकासाला गती देईल.

हेही वाचा: Indian Railway : फेसबुक, ट्विटरनंतर आता भारतीय रेल्वेने केली कर्मचारी कपात; वाचा काय आहे कारण?

अहवालानुसार, कोरोना निर्बंध हटवल्यानंतर आणि सणासुदीच्या काळातील विक्रीचे प्रमाण पाहता, असे म्हणता येईल की नवीन व्यवसाय वाढीमुळे येत्या दोन तिमाहीत कंपन्यांकडून नोकरभरती दिसू शकते.

अहवालात म्हटले आहे की, जागतिक आर्थिक मंदीमुळे भारताच्या निर्यातीत घट होऊ शकते, तरीही चांगली देशांतर्गत मागणी, गुंतवणूक आणि संरचनात्मक सुधारणांमुळे आर्थिक विकासाला गती मिळण्यास मदत होईल.