रेनोची ट्राइबरची विक्री १० हजाराच्या पार

रेनोची ट्राइबरची विक्री १० हजाराच्या पार

नवी दिल्ली : रेनो या भारतातील अव्वल क्रमांकाच्या युरोपीयन ब्रॅंडने ‘ट्राइबर’ ही गाडी सादर केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत १०००१ वी गाडी विकण्याचा टप्पा गाठल्याची घोषणा केली आहे. बेंचमार्क मोटर्स या कंपनीच्या मुंबईतील डीलरशिपमध्ये ही गाडी हस्तांतरित करण्यात आली.

भारतात सध्या आर्थिक मंदीचे जे काही वातावरण आहे, त्यातही रेनोने प्रगती कायम राखल्याचे रेनो ट्राइबरच्या सादरीकरणाने सिद्ध झाले होते. कंपनीने ऑक्‍टोबर २०१९ मध्ये ११५१६ गाड्यांची विक्री केली आणि त्यामुळे मागील वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत विक्रीमध्ये ६३% टक्के वाढ अनुभवली असल्याचे कंपनीच्या प्रवक्‍त्याने सांगितले.

रेनो ट्राइबर ही आकर्षकरित्या डिझाइन केलेली, प्रशस्त आणि मॉड्युलर तसेच अगदी सुसज्ज अशी गाडी आहे. या गाडीमध्ये अवघ्या चार मीटरच्या जागेत सात प्रौढ माणसे आरामात प्रवास करतात. रेनो ट्राइबरमध्ये मिळणाऱ्या परिपूर्ण अनुभवामुळे योग्य किमतीचे मूल्य हव्या असणाऱ्या व्यापक प्रमाणातील ग्राहकांमध्ये कंपनीची प्रचंड लोकप्रियता आहे.

web title : Renault Tribers sales exceed ten thousand

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com