कर्जदारांना दिलासा: 'या' बँकांकडून कर्जदरात कपात

कर्जदारांना दिलासा: 'या' बँकांकडून कर्जदरात कपात

मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील आणखी काही बँकांकडून कर्जदरात कपात करण्यात आली आहे. स्टेट बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्रनंतर आता सिंडिकेट बँक आणि आयडीबीआय बँकेने एमसीएलआर दरात कपात केली आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केल्यानंतर दर कपातीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी आता बँकाकडून देखील दर कपात केली जात आहे. 

सिंडिकेट बँकेने एमसीएलआर दरात 25 बेसिस पॉईंट्सची कपात करण्याची घोषणा केली आहे. येत्या 12 ऑगस्टपासून नवीन दर  लागू होतील. शिवाय सिंडिकेट बँकेने कर्जदर आणि बचत खात्यावरील व्याजदराचा संबंध थेट रिझर्व्ह बँकेच्या रेपो दराशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भविष्यात रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कपात केली गेल्यास त्याचा तत्काळ फायदा  सिंडिकेट बँकेच्या खातेधारकांना मिळणार आहे. तसेच रेपो दर वाढल्यास कर्ज आणि ठेवींवरील व्याजदरात देखील वाढ होईल. आयडीबीआय बँकेने देखील विविध कालावधींसाठी एमसीएलआरमध्ये 5 बीपीएस ते 15 बीपीएस घट केली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com