रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरला 4 वर्षांचा कार्यकाळ हवा

यूएनआय
मंगळवार, 2 ऑगस्ट 2016

नवी दिल्ली - रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरपदासाठी चार वर्षांचा स्थिर कालावधी असावा, अशी मागणी कॉंग्रेस खासदार राजीव शुक्‍ला यांनी मंगळवारी राज्यसभेत केली. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपत आला असून, यानंतर मुदतवाढ मागण्यास त्यांनी नकार दर्शविला आहे.

राजीव शुक्‍ला म्हणाले, ""राजन यांना दुसऱ्यांदा हे पद नको आहे, असे जाहीर केले आहे. याबाबत अनेक विधाने करण्यात आली असून, वादविवादही झाले असल्याने दुखावून ते बाहेर पडत आहे. अमेरिकी मध्यवर्ती बॅंकेप्रमाणे रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरला चार वर्षांचा स्थिर कालावधी असावा. ब्रिटनमध्ये हा कालावधी आठ वर्षे आहे. जागतिक पातळीवर विचार करता मध्यवर्ती बॅंकांच्या प्रमुखांना सरासरी पाच ते सहा वर्षांचा कार्यकाळ आहे. भारतात सहा ते आठ वर्षे कार्यकाळ देणे शक्‍य नाही. सध्याची तरतूद तीन वर्षे कार्यकाळ आणि दोन वर्षे मुदतवाढ अशी आहे. असे न करता गव्हर्नरला चार वर्षांचा स्थिर कार्यकाळ द्यायला हवा.‘

Web Title: Reserve bank