रिझर्व्ह बॅंकेला मिळेना शिमल्यात जागा

वृत्तसंस्था
सोमवार, 29 मे 2017

जागा खरेदीचा विचार सोडून आता भाडेतत्त्वावरील जागेचा शोध

नवी दिल्ली: शिमल्यातील मॉल रोडवर कार्यालय आणि निवासी संकुलासाठी वारंवार प्रयत्न करूनही जागा विकत न मिळाल्याने अखेर रिझर्व्ह बॅंकेने दुसऱ्या भागात भाडेतत्त्वावर जागा पाहण्यास सुरवात केली आहे.

जागा खरेदीचा विचार सोडून आता भाडेतत्त्वावरील जागेचा शोध

नवी दिल्ली: शिमल्यातील मॉल रोडवर कार्यालय आणि निवासी संकुलासाठी वारंवार प्रयत्न करूनही जागा विकत न मिळाल्याने अखेर रिझर्व्ह बॅंकेने दुसऱ्या भागात भाडेतत्त्वावर जागा पाहण्यास सुरवात केली आहे.

सध्या रिझर्व्ह बॅंकेचे उपविभागीय कार्यालय शिमल्यात आहे. हिमाचल प्रदेशमध्ये विस्तारीकरण करण्याचा निर्णय बॅंकेने घेतला आहे. यासाठी कार्यालय आणि निवासी संकुल उभारण्याची योजना रिझर्व्ह बॅंकेने आखली होती. गेल्या वर्षी सप्टेंबरपासून रिझर्व्ह बॅंक यासाठी मॉल रोडवर जागा खरेदी करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, अद्याप जागा मिळालेली नाही, त्यामुळे अखेर बॅंकेने छोटा शिमला भागात भाडेतत्त्वावर छोटी जागा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

रिझर्व्ह बॅंकेने सुरवातीला मॉल रोडवर रिज भागात चार किलोमीटर परिसरात 15 ते 20 हजार चौरस फूट जागा खरेदीसाठी निविदा काढली होती. याला प्रतिसाद न मिळाल्याने बॅंकेने या वर्षी फेब्रुवारीमध्ये भाडेतत्त्वावर छोटी जागा मिळविण्यासाठी निविदा काढली. या निविदेत छोटा शिमला परिसरात भाडेतत्त्वावर जागा हवी असल्याचे नमूद केले आहे. रिझर्व्ह बॅंकेचे मुख्यालय मुंबईत असून, बॅंकेची देशभरात 31 ठिकाणी कार्यालये आहेत.

शिमला हे पर्यटन क्षेत्र आहे. यामुळे फार मोठी जागा भाडेतत्त्वावर उपलब्ध नाही. तसेच, एकाच व्यक्ती अथवा संस्थेच्या मालकीची मोठी जागा खरेदी करण्यासाठी उपलब्ध होणेही अवघड आहे. याचबरोबर येथे जागावापरावर अनेक निर्बंध आहेत. 
- मयांक सक्‍सेना, व्यवस्थापकीय संचालक, जेएलएल इंडिया (मालमत्ता सल्लागार कंपनी)

Web Title: The Reserve Bank finds place in Shimla