निवृत्त बॅंक अधिकारी दक्षता आयोगाच्या रडारवर

पीटीआय
बुधवार, 9 मे 2018

नवी दिल्ली - भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकल्यानंतर कारवाई न झालेले सरकारी बॅंकांचे निवृत्त वरिष्ठ अधिकारी केंद्रीय दक्षता आयोगाच्या रडारवर आले आहेत. या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात झालेल्या गैरप्रकारांची सर्व माहिती संबंधित बॅंकांकडून मागविण्यात आली आहे. 

निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या गैरप्रकारांची माहिती बॅंकांनी दिल्यानंतर दक्षता आयोग त्यांच्यावर कारवाई सुरू करेल. अनेक सरकारी बॅंका वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ नये, यासाठी गैरप्रकार लपवून ठेवत असल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. या पार्श्‍वभूमीवर दक्षता आयोगाने हे पाऊल उचलले आहे. बॅंकांनी गैरप्रकारच्या प्रकरणानंतर दक्षता आयोगाचा सल्ला पहिल्या टप्प्यात घेणे गरजेचे असून, त्यानंतर दंडात्मक कारवाईवेळी दुसऱ्या टप्प्यात सल्ला घेणे आवश्‍यक आहे. पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) सुमारे १३ हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारानंतर अनेक बॅंकांमधील गैरप्रकार उघडकीस येत आहेत.

या अधिकाऱ्यांचा समावेश 
केंद्रीय दक्षता आयोगाने सुरू केलेल्या चौकशीत बॅंकांचे विभागीय व्यवस्थापक, सहायक सरव्यवस्थापक, उपसरव्यवस्थापक, सरव्यवस्थापक, कार्यकारी संचालक, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या दर्जाच्या निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Web Title: Retired Bank Officer on Efficiency Commission Radar