रोझ व्हॅलीच्या मालमत्तेवर टाच

पीटीआय
शुक्रवार, 30 मार्च 2018

कोलकता - चिट फंड गैरव्यवहारप्रकरणी रोझ व्हॅली समूहाच्या दोन डझन हॉटेल आणि रिसॉर्टसह २ हजार ३०० कोटी रुपयांची मालमत्ता सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी जप्त केली. 

कोलकता - चिट फंड गैरव्यवहारप्रकरणी रोझ व्हॅली समूहाच्या दोन डझन हॉटेल आणि रिसॉर्टसह २ हजार ३०० कोटी रुपयांची मालमत्ता सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी जप्त केली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत पश्‍चिम बंगालमधील रोझ व्हॅली समूहाची ११ रिसॉर्ट, नऊ हॉटेल आणि अन्य काही व्यावसायिक मालमत्ता, तसेच, दोनशे व ४१४ एकरचे दोन भूखंड जप्त करण्यात आले आहेत. ‘ईडी’ने करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यानुसार एकाच वेळी जप्त केलेली ही सर्वाधिक मालमत्ता आहे. याप्रकरणी आतापर्यंत जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत ४ हजार २०० कोटी रुपयांवर गेली आहे. ‘ईडी’ने रोझ व्हॅली समूहाचे अध्यक्ष गौतम कुंडू आणि इतरांविरोधात २०१४ मध्ये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी २०१५ मध्ये कुंडू याला कोलकत्यात अटक करण्यात आली. याप्रकरणी अनेक आरोपपत्र कोलकता आणि भुवनेश्‍वर येथील न्यायालयात ‘ईडी’ने दाखल केली आहेत. 

रोझ व्हॅली समूहाने २७ कंपन्या स्थापन करून त्यांच्यामार्फत चिट फंड चालविले होतील. यातील केवळ सहाच चालू होते. गुंतवणूकदारांना ८ ते २७ टक्के परताव्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करण्यात आली. अनके राज्यांमध्ये कंपनीने गुंतवणूकदारांची अशा प्रकारचे फसवणूक केली आहे. भांडवल बाजार नियंत्रक संस्था ‘सेबी’ने रोझ व्हॅलीची चौकशीही केली आहे. या समूहाने १५ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे तपास यंत्रणांनी म्हटले आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात संतप्त गुंतवणूकदारांनी कोलकत्यातील कंपनीच्या एका हॉटेलची तोडफोड केली होती.

Web Title: Rose Valley property ED