बजेट 2019: मोदींचा 'सुपर सिक्सर': अवघ्या 59 मिनिटांत 1 कोटींचे कर्ज!

वृत्तसंस्था
Friday, 5 July 2019

अर्थसंकल्प 2019: नवी दिल्ली: लहान उद्योजक आणि उद्योगांना केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. लहान उद्योगांना आणि नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या छोट्या उद्योगांसाठी अवघ्या 59 मिनिटात 1 कोटी रुपयांचे कर्ज देण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. एमएसएमई सेक्टरला बळ देण्यात आले आहे. काल सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वे पाहणी अहवालातही एमएसएमईवर जोर देण्यात आला होता. त्यामुळे त्याबाबत मोठ्या घोषणेची अपेक्षा आधीपासूनच होती. 

 देशातील 3 कोटींपेक्षा अधिक दुकानदारांना या योजनेचा लाभ होणार आहे. वय वर्षे 18 ते 40 मधील तरुण या योजनेचा लाभ घेऊ शकतील. देशातील 3.25 लाख सेवा केंद्रावर यासाठी नोंदणी करता येईल. केंद्रीय अर्थसंकल्पात ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेप्रमाणेच छोट्या उद्योगांकडेही विशेष लक्ष देण्यात आले  आहे. लघू उद्योजकांच्या कर्जात वाढ करण्यासाठी कर्जाच्या रकमेत वाढ करण्याची शिफारस बँकांनी केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे केली होती. आता सीडबी, भारतीय स्टेट बॅंकेसहित 21 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधून हे कर्ज वितरीत केले जाणार आहे. MSME म्हणजेच मायक्रो, स्मॉल आणि मीडियम एंटरप्रायजेसअंतर्गत सरकारने 350 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. अर्थमंत्रालयाचे उद्धिष्ट हे 'रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म' आहे, असे सीतारामन यांनी सांगितले. एकाच दगडात दोन पक्षी म्हणजे लघु उद्योजगांना बळ देऊन सरकार रोजगारनिर्मितीचा प्रश्न देखील मार्गी लावणार आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rs 1 crore loan in 59 minutes for MSMEs