रुपया 12 पैशांनी वधारला

वृत्तसंस्था
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

मुंबई: बँका आणि आयातदारांनी नव्याने अमेरिकी चलनाची विक्री सुरु केल्याने भारतीय रुपयाचे मूल्य आज(सोमवार) डॉलरच्या तुलनेत 12 पैशांनी वधारुन 67.19 रुपये झाले आहे. याशिवाय, देशांतर्गत शेअर बाजारातील सकारात्मक वातावरणाचा रुपयातील वाढीला हातभार लागला आहे.

रुपयाची सुरुवात 10 पैशांच्या वाढीसह 67.21 रुपयांवर झाली. सकाळी साडेदहाच्या सुमारास प्रति डॉलर 67.23 आणि 67.18 रुपयांदरम्यान चलनाचा व्यवहार सुरु होता. याआधी शुक्रवारी रुपयाचा डॉलरच्या तुलनेत 67.31 रुपयांवर शेवट झाला होता.

Web Title: Rs 12 paisa up today