बांधकाम क्षेत्रात रु.38,000 कोटींची ‘पीई’ गुंतवणूक

वृत्तसंस्था
सोमवार, 16 जानेवारी 2017

बंगळुरु: भारतातील स्थावर मालमत्ता क्षेत्रातील खासगी भांडवली(प्रायव्हेट इक्विटी) गुंतवणूकीचे प्रमाण गेल्यावर्षी(2016) तब्बल 62 टक्क्यांनी वाढून 38,000 कोटी रुपयांवर पोचले आहे. याअगोदरच्या वर्षात(2015) या क्षेत्रात 23,500 कोटी रुपयांची गुंतवणूक दाखल झाली होती.

एकुण गुंतवणूकीपैकी 'प्युअर इक्विटी' अर्थात शेअर बाजारातून 13,500 कोटी रुपयांची गुंतवणूक दाखल झाली आहे. ऊर्वरित गुंतवणूक रोखे बाजारातून दाखल झाली आहे. केवळ शेअर्सद्वारे होणाऱ्या गुंतवणूकीचे प्रमाण 29 टक्क्यांनी वाढले आहे, अशी माहिती जेएलएल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि कॅपिटल मार्केट्स अँड इंटरनॅशनल अध्यक्ष शोभित अग्रवाल यांनी दिली.

देशातील इक्विटी गुंतवणूक पुन्हा वाढीस लागत आहे. धोरणांमध्ये बदलानंतर या गुंतवणूकीत आणखी वाढ अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले.

Web Title: Rs .38,000 crore in construction sector 'PE' investment