अन् काही मिनिटात झाले चार लाख कोटी रुपये स्वाहा!

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

मुंबई: जागतिक बाजारात पडझड झाल्यानंतर त्यांचा भारतीय शेअर बाजाराला देखील ओठ फटका बसला. भारतीय शेअर बाजार सुरु होताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेंसेक्स 1037 अंशांनी कोसळला. परिणामी गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. गुंतवणूकदारांचे काही मिनिटांमध्ये चार लाख कोटी रुपये स्वाहा झाले. निफ्टीमध्येही 300 अंशांची घसरण झाली. 

अमेरिकी शेअर बाजार आठ महिन्यातील नीचांकी पातळीवर पोचले. त्याचाच परिणाम म्हणून आशियाई शेअर बाजारांमध्ये घसरणीचे लोण पसरले. जपान, चीन, हाँगकाँग, सिंगापूर या देशातील बाजारांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर घसरण नोंदवण्यात आली. 

काल (बुधवार) मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 461 अंशांनी वधारला होता. त्यामुळे गुंतवणूकदारांचे बाजारभांडवल 3 लाख कोटींनी वधारले होते. मात्र आज सेन्सेक्समध्ये पुन्हा मोठी घसरण झाल्याने शेअर बाजार सुरु होताच अवघ्या काही मिनिटांत 4 लाख कोटी रुपये स्वाहा झाले. 

सध्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 34 हजार 48 अशांवर व्यवहार करत असून त्यात 712 अंशांची घसरण झाली आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 216 अंशाच्या घसरणीसह 10 हजार 243 अशांवर व्यवहार करतो आहे.

रुपया तळाला: 

शेअर बाजाराप्रमाणेच बुधवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य देखील 18 पैशांनी वधारले होते. मात्र, आज (गुरुवार) रुपयाने नवीन नीचांक गाठला आहे. एका डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 26 पैशांच्या घसरणीसह 74.46 रुपयांवर पोचले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rs 4 lakh crore gone from investor wealth