रॉयल एनफिल्डचे माजी अध्यक्ष रुद्रतेज सिंग आता 'बीएमडब्ल्यू'च्या ड्रायव्हिंग सीटवर...

वृत्तसंस्था
Thursday, 20 June 2019

नवी दिल्ली: रुदतेज सिंग यांची 'बीएमडब्ल्यू' समूहाच्या भारतातील अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी पदावर नियुक्ती झाली आहे. 1 ऑगस्ट 2019 पासून ही नियुक्ती लागू होणार आहे. रुदतेज सिंग याआधी आयशर मोटर्सची लोकप्रिय मोटरसायकल रॉयल एनफिल्डच्या अध्यक्षपदावर कार्यरत होते. रुदतेज सिंग यांच्याकडे जानेवारी 2015 ते 2019 या कालावधीदरम्यान रॉयल एनफिल्डची धुरा होती. जानेवारी 2019 मध्ये रुद्रतेज सिंग रॉयल एनफिल्डमधून बाहेर पडले. नुकताच सिंग यांनी बीएमडब्ल्यू इंडियामधील आपली नियुक्ती जाहीर केली.

नवी दिल्ली: रुदतेज सिंग यांची 'बीएमडब्ल्यू' समूहाच्या भारतातील अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी पदावर नियुक्ती झाली आहे. 1 ऑगस्ट 2019 पासून ही नियुक्ती लागू होणार आहे. रुदतेज सिंग याआधी आयशर मोटर्सची लोकप्रिय मोटरसायकल रॉयल एनफिल्डच्या अध्यक्षपदावर कार्यरत होते. रुदतेज सिंग यांच्याकडे जानेवारी 2015 ते 2019 या कालावधीदरम्यान रॉयल एनफिल्डची धुरा होती. जानेवारी 2019 मध्ये रुद्रतेज सिंग रॉयल एनफिल्डमधून बाहेर पडले. नुकताच सिंग यांनी बीएमडब्ल्यू इंडियामधील आपली नियुक्ती जाहीर केली. बीएमडब्ल्यू या जगप्रसिद्ध आलिशान कार उत्पादक कंपनीनेसुद्धा सिंग यांच्या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. भारत ही बीएमडब्ल्यूसाठी महत्त्वाची बाजारपेठ असून भविष्यात इथे मोठ्या संधी असल्याचे मत कंपनीकडून व्यक्त करण्यात आले. 

रुद्रतेज सिंग दिल्ली विद्यापीठाचे पदवीधर आहेत. त्यांनी मार्केटिंग आणि फायनान्स विषयात एमबीए केलेले आहे. एनफिल्डमध्ये रुजू होण्याआधी सिंग युनिलिव्हरच्या सिंगापूर येथील कार्यालयातून कंपनीच्या दक्षिण आशियाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत होते. सिंग यांची 25 वर्षांची यशस्वी कारकिर्द आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rudratej Singh, former Royal Enfield boss, to head BMW India