दहा रुपयांची नाणी बनावट नाहीत- आरबीआय

वृत्तसंस्था
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

गेल्या अनेक वर्षांपासून ही नाणी चलनात आहेत व त्यामुळे त्यांचा आकार व रचना वेगवेगळी असू शकते, असे आरबीआयने म्हटले आहे. रुपयाचे चिन्ह असलेली नवी नाणी 2011 साली चलनात आणण्यात आली होती.

नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) दहा रुपयांच्या नाण्यांविषयी निर्माण झालेल्या अफवांचे खंडन केले असून, सर्वसामान्य नागरिकांनी याकडे दुर्लक्ष करीत बिनदिक्कतपणे या नाण्यांचा व्यवहार करावा, असे आवाहन केले आहे. 

आरबीआयने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "चुकीची व कमी माहिती बाळगणाऱ्या काही लोकांनी व्यापारी, दुकानदारांसह सर्वसामान्य लोकांच्या मनात या नाण्यांविषयी शंका निर्माण केली आहे. यामुळे देशाच्या काही भागांमध्ये या नाण्यांच्या व्यवहारावर परिणाम होत असून लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. रिझर्व्ह बँकेकडून लोकांना असे आवाहन केले जात आहे की लोकांनी या अफवांकडे दुर्लक्ष करावे व बिनदिक्कतपणे आपल्या सर्व व्यवहारांमध्ये या नाण्यांचा स्वीकार करावा." 

गेल्या अनेक वर्षांपासून ही नाणी चलनात आहेत व त्यामुळे त्यांचा आकार व रचना वेगवेगळी असू शकते, असे आरबीआयने म्हटले आहे. रुपयाचे चिन्ह असलेली नवी नाणी 2011 साली चलनात आणण्यात आली होती.

Web Title: Rumours about fake 10-rupee coins add to demonetisation woes

टॅग्स