रुपया पोरका 

वृत्तसंस्था
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

नवी दिल्ली - केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेच्या ठोस उपाययोजनांअभावी चलन बाजारात रुपयाची होरपळ मंगळवारी (ता.४) कायम राहिली. दिवसअखेर रुपया ३७ पैशांच्या अवमूल्यनासह डॉलरच्या तुलनेत ७१.५८ च्या नीचांकी पातळीवर बंद झाला. 

नवी दिल्ली - केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेच्या ठोस उपाययोजनांअभावी चलन बाजारात रुपयाची होरपळ मंगळवारी (ता.४) कायम राहिली. दिवसअखेर रुपया ३७ पैशांच्या अवमूल्यनासह डॉलरच्या तुलनेत ७१.५८ च्या नीचांकी पातळीवर बंद झाला. 

खनिज तेलाच्या किमती वाढण्याची शक्‍यता लक्षात घेता, तेल आयातदारांनी तेल आयातीवर भर दिला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून डॉलरला मोठी मागणी आहे. दरम्यान, तुर्कस्तान चलन संकट, अमेरिका आणि चीनमधील व्यापारी संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही सत्रांपासून डॉलरची उदयोन्मुख चलनांविरोधात कामगिरी दिवसागणीक बहरत आहे. याचा फटका रुपयालादेखील बसला असला आहे. ‘‘रिझर्व्ह बॅंकेकडे ४०० अब्ज डॉलरची गंगाजळी आहे. मात्र बॅंकेकडून रुपया सावरण्यासाठी हस्तक्षेप न केल्याने पडझड कायम आहे. खनिज तेलाच्या वाढत्या किमती आणि जागतिक बाजारातील घडामोडींनी डॉलर इंडेक्‍स तेजीत आहे. लवकरच तो ७२ ते ७३ च्या स्तरापर्यंत जाईल,’’ असा अंदाज आनंद राठी ब्रोकर्सचे चलन बाजार विश्‍लेषक ऋषभ मारू यांनी व्यक्त केला.

इंधन शुल्क कपातीस नकार
रुपया गाळात गेल्याने आयात खर्चिक बनेल. यामुळे वित्तीय तूट निर्धारित उद्दिष्टापेक्षा वाढण्याची भीती आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील शुल्क कमी केल्यास आर्थिक घडी विस्कटण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर इंधनावरील उत्पादन शुल्क कपातीची जोखीम सरकार घेणार नाही. उत्पन्नाच्या तुलनेत खर्चासाठी मर्यादित महसूल असल्याने शुल्क कपात होणार नाही, असे संकेत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rupee depreciated by 37 paise to close at 71.58 against dollar