रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

मुंबई : परकीय गुंतवणूकदारांचा गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा आणि जागतिक बाजारपेठेत डॉलरच्या मागणीतील वाढ यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयात 30 पैशांनी घसरून 68.86 या नीचांकी ऐतिहासिक पातळीवर गेला. या आधी रुपयाचे सर्वाधिक अवमूल्यन 28 ऑगस्ट 2013 रोजी 68.80 इतके झाले होते. या आठवड्यात रुपयाचे सातत्याने अवमूल्यन सुरू आहे.

केंद्र सरकाच्या नोटाबंदीच्या निर्णय एकूणच सर्वच क्षेत्रांना जड जात असल्याचे चित्र आहे. त्यातच रिझर्व्ह बॅंकेकडून रुपयाची होरपळ थांबवण्यासाठी अद्यापही ठोस उपाययोजना करण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. त्यातच अमेरिकन रोखे उत्पादनातील वाढही रुपयाच्या अवमूल्यनास कारणीभूत ठरली. सध्या अमेरिकन डॉलरचे मूल्य अनेक वर्षांनंतर परकीय आंतरराष्ट्रीय बाजारातील प्रतिस्पर्धी चलनाच्या तुलनेत सर्वाधिक झाले आहे.

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आर्थिक विकासाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे महागाई वाढण्याची चिन्हे असून अमेरिकन डॉलरला बळकटी मिळण्याची शक्‍यता व्यक्‍त होत आहे. त्यामुळे परकीय गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी डॉलरला मजबूत करण्याचे अमेरिकन सरकारचे धोरण आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांकडून डॉलरच्या मागणीत होणारी वाढ रुपयाच्या घसरणीला कारणीभूत ठरत आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदावर निवडून आल्यानंतर रुपयाचे सातत्याने अवमूल्यन होत आहे. या महिनाभरात आठवड्यांमध्ये रुपया तब्बल 2.92 टक्‍क्‍यांनी घसरला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरातील व्यापाऱ्यांचे धाबे दणानले. नोटाबंदीच्या निर्णयामुळे चलनतुटवडा तर झालाच पण याची सर्वाधिक झळ रुपयाला बसली. परकीय गुंतवणुकदारांनीही सावध पावले उचलल्यामुळे रुपयाची घसरण सुरूच राहिली, परिणामी गुरुवारी रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली.

Web Title: rupee devaluation