डॉलरच्या तुलनेत रुपयाचे ऐतिहासिक अवमूल्यन

कैलास रेडीज | Tuesday, 14 August 2018

बुधवारी (ता.14) डॉलरच्या तुलनेत रुपयाने प्रथमच 70 ची नीचांकी पातळी गाठली. कमुकवत रुपयामुळे चालू खात्याचा समतोल बिघडणार असून आयातीवरील वाढीव खर्चाने महागाईचा भडका उडण्याची शक्‍यता आहे. 

मुंबई : अमेरिका आणि चीनमधील व्यापारी युद्ध , तुर्कस्तान मधील चलन संकटाची धग भारतीय चलनाला बसली आहे. जागतिक बाजारात डॉलरची मागणी वाढली असून रुपयासह आशियातील अनेक चलन मूल्यात आज मोठ्याप्रमाणात पडझड दिसून आली.

बुधवारी (ता.14) डॉलरच्या तुलनेत रुपयाने प्रथमच 70 ची नीचांकी पातळी गाठली. कमुकवत रुपयामुळे चालू खात्याचा समतोल बिघडणार असून आयातीवरील वाढीव खर्चाने महागाईचा भडका उडण्याची शक्‍यता आहे. 

रिझर्व्ह बॅंकेकडून चलन सावरण्यासाठी ठोस उपाययोजना न झाल्याने रुपयातील पडझड कायम आहे.