शेअर बाजारात घसरण; रुपयाचा नवा नीचांक 

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

मुंबई:  रुपयाची घसरण सुरूच असून डॉलरच्या तुलनेत रुपयाने 74.27 रुपयांची नीचांकी पातळी गाठली आहे. जागतिक पातळीवर क्रूड ऑइलच्या किंमती वाढल्याने अमेरिकी डॉलरला बळ मिळाले आहे. कच्च्या तेलाचे वाढते दर, त्यामुळे देशांतर्गत पातळीवर इंधनाच्या दरात झालेली वाढ, आयएल अॅंड एफएसचे आर्थिक अरिष्ट, 35 हजाराच्या पातळीच्या खाली उतरलेला सेन्सेक्स या सर्वांचा परिणाम रुपयावरही होताना दिसतो आहे. 

सद्य परिस्थितीत रुपया रोजच डॉलरच्या तुलनेत नीचांकी पातळीवर पोचतो आहे. रुपयाचे मूल्य घसरत जाण्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवरही होताना दिसतो आहे. शिवाय कच्च्या तेलाच्या वाढत्या दरांमुळे चालू खात्यातील तूट आणखी वाढत जाण्याची शक्यता आहे. 

आज (मंगळवार) शेअर बाजारात देखील घसरण बघायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 174.91 अंशांच्या घसरणीसह 34 हजार 299.47 पातळीवर व्यवहार करत बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 47 अंशांची घसरण झाली. निफ्टी अखेर 10 हजार 301.05 अंशांवर बंद झाला. अखेरच्या तासात शेअर बाजारात घसरण बघायला मिळाली. क्षेत्रीय पातळीवर फार्मा, आयटी आणि मेटल शेअर कंपनीच्या शेअरमध्ये खरेदी दिसून आली. फार्मा इंडेक्स 1.4 टक्के, आयटी इंडेक्स 0.42 टक्के आणि मेटल इंडेक्स 1.03 टक्क्यांनी वधारून बंद झाला. 

आज मुंबई शेअर बाजारात टाटा मोटर्स, टायटन, आयशर मोटर्स आणि एचपीसीएल, यांच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली. तर अदानी पोर्ट, झी एंटरटेनमेंट, डीआरएल आणि बजाज फायनान्समध्ये सर्वाधिक घसरण नोंदवण्यात आली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rupee Hits Lifetime Low Of 74.27 Against Dollar