डॉलरच्या तुलनेत रुपयाची उसळी; 'हे' आहे डॉलरचे आजचे मूल्य

वृत्तसंस्था
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात घट झाल्याने बुधवारी रुपयाने उसळी घेतली. डॉलरच्या तुलनेत रुपया 54 पैशांची वाढ होऊन 71.24 या पातळीवर बंद झाला.

मुंबई : जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात घट झाल्याने बुधवारी रुपयाने उसळी घेतली. डॉलरच्या तुलनेत रुपया 54 पैशांची वाढ होऊन 71.24 या पातळीवर बंद झाला.

खनिज तेलाच्या भावात घट झाल्याने रुपयासह इतर विकसनशील देशांच्या चलनांमध्ये आज तेजी निर्माण झाली. चलन बाजारात आज सकाळपासून रुपयात वाढ नोंदविण्यात आली. अखेर तो मागील सत्राच्या तुलनेत 54 पैशांची वाढ होऊन 71.24 या पातळीवर बंद झाला. परकी निधीचा बाहेर जाणारा ओघ कायम राहिल्याने रुपयातील तेजी काही प्रमाणात रोखली गेल्याची माहिती चलन बाजार विश्‍लेषकांनी दिली.

खनिज तेलाच्या भावात घट
सौदी अरेबियातील खनिज तेलाचे उत्पादन या महिन्याच्या अखेरीस पूर्ववत होईल, असा विश्‍वास सौदी अरेबियाच्या ऊर्जामंत्र्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे जागतिक पातळीवर आज खनिज तेलाच्या भावात घट होऊन तो प्रतिबॅरल 64.32 डॉलरवर आला.

खनिज तेलाच्या भावात घट झाल्यामुळे चलनवाढ आणि वित्तीय तुटीचा बोजा वाढण्याची चिंता कमी झाली आहे. यामुळे रिझर्व्ह बॅंकेकडून ऑक्‍टोबरमधील पतधोरणात व्याजदर कपात होण्यास जागा निर्माण झाली आहे.- व्ही. के. शर्मा, एचडीएफसी सिक्‍युरिटीज


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rupee jumps sharply against US dollar today