रुपयाची डॉलरसमोर लोळण

Sakal | Thursday, 30 August 2018

मुंबई - परकी गुंतवणूकदारांचा गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा आणि आयातदार कंपन्यांकडून डॉलरची मागणी वाढल्याने चलन बाजारात बुधवारी रुपयाने लोळण घेतली. डॉलरच्या तुलनेत रुपयात आज ४९ पैशांचे अवमूल्यन झाले आणि तो ७०.५९ वर बंद झाला. दिवसभरात रुपयाने ७०.६५ ची सार्वकालीन नीचांकी पातळी गाठली होती. जागतिक बाजारात खनिज तेलाच्या वाढत्या भावाच्या पार्श्‍वभूमीवर तेलवितरक कंपन्यांकडून डॉलरची मागणी वाढली आहे.

बॅंका आणि आयातदारांनीही डॉलरची मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने रुपयाला फटका बसल्याचे चलन बाजारातील विश्‍लेषकांनी सांगितले. यापूर्वी रुपयाने ७०.१६ ची नीचांकी पातळी गाठली होती. रुपयात १३ ऑगस्टला ११० पैशांचे अवमूल्यन झाले होते. आजच्या सत्रात रिझर्व्ह बॅंकेकडून ठोस उपाययोजना न झाल्याने रुपयातील पडझड कायम राहिली.