फ्लिपकार्टचे सचिन बन्सल करताय नवीन व्यवसाय खरेदी!

वृत्तसंस्था
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

फ्लिपकार्टचे माजी सहसंस्थापक सचिन बन्सल यांनी एस्सेल ग्रुप म्युच्युअल फंड व्यवसाय खरेदी केला आहे.

मुंबई: फ्लिपकार्टचे माजी सहसंस्थापक सचिन बन्सल यांनी एस्सेल ग्रुप म्युच्युअल फंड व्यवसाय खरेदी केला आहे. सेबीची परवानगी मिळतातच ते या फंडाचे नवे मालक होतील. त्यांची कंपनी ‘बीएसी अक्विझिशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ला भारतीय स्पर्धा आयोगाकडून (सीसीआय) एस्सेल म्युच्युअल फंडाची खरेदी करण्यासाठी परवानगी मिळाली आहे.

सप्टेंबर 2019 पर्यंतच्या आकडेवारीनुसार एस्सेल म्युच्युअल फंड 901 कोटी रुपयांच्या एयूएमचे व्यवस्थापन करत आहे. तर फंड हाऊसचे मूल्य 30 कोटी रुपये आहे. सचिन बन्सल आणि एंजेल इन्व्हेस्टर अंकित अग्रवाल हे दोघे या व्यवहारातील गुंतवणूकदार आहेत. अग्रवाल हे बँक ऑफ अमेरिकेत संचालक होते.

सचिन बन्सल यांचा रोख पर्सनल इन्वेस्टमेन्ट फर्म्सकडे
मागील वर्षी फ्लिपकार्टने आपली पूर्ण हिस्सेदारी वॉलमार्टला विकल्यानंतर सचिन बन्सल यांनी बँकिंग, फायनास सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स (बीएफएसआय) इंडस्ट्रीजमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. वेगवेगळय़ा मार्गानी गुंतवणूक करुन त्यांनी पर्सनल इन्वेस्टमेन्ट कंपनी बीएसी अक्विझिशन्स प्रायव्हेट लिमिटेड सुरु केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sachin Bansal gets CCI nod for acquiring Essel Mututal Fund