सेबीच्या सहारा म्युच्युअल फंडाला सूचना : सर्व स्किम्स गुंडाळा

वृत्तसंस्था
शनिवार, 28 एप्रिल 2018

मुंबई : शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडांच्या कार्यपद्धतींची नियामक असणाऱ्या सेबीने सहारा म्युच्युअल फंड कंपनीला सर्व स्किम्स गुंडाळण्याच्या सूचना केल्या आहेत.

सहाराच्या सर्व योजना होणार बंद
सहाराकडून चालवल्या जात असणाऱ्या सर्व म्युच्य़ुअल योजना 21 एप्रिल 2018 पर्यंत बंद करण्याचे आदेश सेबीने दिले आहेत. यात फक्त "सहारा टॅक्स गेन फंड" या योजनेचा अपवाद करण्यात आला आहे.  टॅक्स गेन फंड असल्यामुळे या योजनेला 27 ऑगस्ट 2018 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. परंतु या योजनेत नवीन गुंतवणूक स्वीकारण्यास मात्र मनाई करण्यात आली आहे. 

सहारा कायद्याच्या कचाट्यात
सहारा समूहाची सेबीबरोबर दिर्घकाळापासून कायदेशीर आणि न्यायालयीन लढाई सुरू आहे. सहारा समूहातील दोन कंपन्यांनी सेबीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तसेच त्यांच्या कारभारात अनियमियता आढळून आल्यामुळे सेबीने त्यांना 24,000 कोटी रुपयांची  परतफेड करण्याचा आदेश दिला आहे. जुलै 2015 मध्ये सेबीने सहारा म्युच्युअल फंड कंपनीची नोंदणी रद्द केली होती. सहारा म्युच्युअल फंड कंपनी या क्षेत्रात काम करण्यासाठी सक्षम आणि योग्य नसल्याचं सेबीचं म्हणणं आहे. नोंदणी रद्द करताना सेबीने सहाराला सहा महिन्यांचा कालावधी दिला होता.

त्याआधी सेबीने सहाराचा पोर्टफोलिओ व्यवस्थापनाचा परवानासुद्धा रद्द केला होता. सेबीच्या निर्णयाविरोधात सहाराने सेक्युरिटिज अॅपेलेट ट्रिबूनल कडे धाव घेतली होती. या ट्रिबूनलने सहाराला सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी सहा आठवड्यांचा कालावधी दिला होता.कोर्टाने ऑक्टोबर 2017 मध्ये सहाराचं अपील फेटाळून लावले होते. त्यानंतर मात्र सहारा म्युच्युअल फंड कंपनीला आपल्या जुलै 2015 च्या सूचनांचे पालन करण्याचा आदेश दिला होता. यावर आपली बाजू मांडतांना सहाराने अशी भूमिका घेतली होती की सेबीच्या आदेशाचे पालन केल्यास सहारा टॅक्स गेन फंडाच्या गुंतवणूकदारांचे  नुकसान होईल. या फंडातून मिळणाऱ्या लाभास गुंतवणूकदार मुकतील. 

ऑगस्ट 2018 अंतिम मुदत
त्यावर पुनर्विचार करताना सेबीने सहारा टॅक्स गेन फंडाव्यतिरिक्त इतर योजना 21 एप्रिल 2018 बंद करण्याचे आदेश दिले आहेत. सहारा टॅक्स गेन फंड या योजनेला 27 ऑगस्ट 2018 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. सहारा म्युच्युअल फंड कंपनीला नोंदणीचे प्रमाणपत्र  27 ऑगस्ट 2018 पर्यंत सेबीकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

गुंतवणूकदारांना दिलासा
सहारा म्युच्युअल फंडाचे विश्वस्त आणि कंपनीचे हस्तांतरण प्रतिनिधी कार्वी कॉम्प्युटरशेअर यांना सेबीने गुंतवणूकदारांची संपर्क माहिती तसेच त्यांची बॅंक खात्याबाबतची माहिती यांची खातरजमा करण्यास सांगितले आहे. त्यामुळे "सहारा टॅक्स गेन फंड"च्या गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याच्या प्रक्रियेत कोणताही विलंब होणार नाही. गुंतवणूकदारांचे कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये किंवा त्या प्रक्रियेत कोणताही विलंब होऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी सेबीने ही पावले उचलली आहेत.

Web Title: Sahara Mutual Fund to wind up all schemes