‘सकाळ मनी’सोबत आता व्यावसायिक भागीदार व्हा!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 February 2019

आर्थिक सेवा क्षेत्रातील आपले कार्यक्षेत्र अधिक विस्तारताना ‘सकाळ मनी’ने आता देशातील आघाडीच्या बॅंका आणि बिगर बॅंकिंग वित्तीय संस्थांशी (एनबीएफसी) संबंध जोडले आहेत. ‘सकाळ मनी’च्या एकाच छताखाली आघाडीच्या बॅंका आणि ‘एनबीएफसी’ यांच्याकडील व्यवसाय कर्ज (बिझनेस लोन) आणि वैयक्तिक कर्ज (पर्सनल लोन) यांसारख्या वित्तीय सेवा ग्राहकांना आकर्षक व्याजदराने आणि सुलभ रीतीने मिळू शकणार आहेत.

यासाठी चार्टर्ड अकाउंटंट, कर सल्लागार, वित्तीय सल्लागार, विमा व गुंतवणूक प्रतिनिधी; तसेच इतर इच्छुकांना या व्यावसायिक उपक्रमात ‘डायरेक्‍ट सेलिंग एजंट’ (डीएसए) म्हणून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

आघाडीचा ब्रॅंड म्हणून आम्ही बॅंका आणि ‘एनबीएफसी’बरोबर विशेष भागीदारी केली असल्यामुळे ग्राहकांना विशेष व्याजदर आणि कमी प्रक्रिया शुल्काचा फायदा घेता येणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला आकर्षक कमिशनसुद्धा मिळू शकणार आहे. याशिवाय आमचे व्यावसायिक भागीदार (डीएसए) झाल्यामुळे तुम्हाला पुढील विशेष लाभ मिळू शकतील.
१)    कमिशन रूपाने नियमित उत्पन्न मिळेल.
२)    तुमच्या कामाचे ‘बॉस’ तुम्हीच व्हाल.
३)    तुम्ही फक्त ग्राहकांचा संपर्क ‘सकाळ मनी’शी करून द्यायचा, पुढील काम पूर्ण करण्यासाठी ‘सकाळ मनी’ची साथ तुम्हाला मिळेल.
४)    नव्या ग्राहकांपर्यंत पोचून नवनव्या संधी शोधल्याने आयुष्यभराच्या उत्पन्नाची तजवीज करता येईल.
५)    विक्री आणि विपणनाच्या संदर्भात ‘सकाळ मनी’कडून पूर्ण सहकार्य मिळेल.
नियमित कमिशनव्यतिरिक्त, आमच्या व्यावसायिक भागीदारांना आकर्षक बक्षिसे आणि परदेशवारीची संधीही मिळू शकेल.

नव्या संधीचा लाभ घेण्यासाठी तुमचे पूर्ण नाव, वय, मोबाईल क्रमांक आणि शहराचे नाव अशी माहिती dsapartners@sakalmoney.com या मेल आयडीवर पाठवावी किंवा ९८८१०९९२०० या क्रमांकावर ‘व्हॉट्‌सॲप’द्वारे पाठवावी. त्याआधारे संबंधितांशी नंतर स्वतंत्रपणे संपर्क साधला जाईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Money Business Partner