‘सकाळ मनी’च्या साथीने आर्थिक उन्नतीची संधी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

प्रत्येकाच्या गरजेनुरूप गुंतवणुकीचे नियोजन करून प्रत्यक्ष म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ‘सकाळ मनी’च्या उपक्रमाची आता राज्यभर चर्चा सुरू झाली असून, वाचक, गुंतवणूकदार आणि स्वतंत्र आर्थिक सल्लागारांकडून (इंडिपेंडंट फायनान्शियल ॲडव्हायझर्स) मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. ‘सकाळ मनी’च्या साथीने आर्थिक उन्नतीची संधी उपलब्ध झाल्याने अनेकजण या उपक्रमात सहभागी होत आहेत.

प्रत्येकाच्या गरजेनुरूप गुंतवणुकीचे नियोजन करून प्रत्यक्ष म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ‘सकाळ मनी’च्या उपक्रमाची आता राज्यभर चर्चा सुरू झाली असून, वाचक, गुंतवणूकदार आणि स्वतंत्र आर्थिक सल्लागारांकडून (इंडिपेंडंट फायनान्शियल ॲडव्हायझर्स) मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. ‘सकाळ मनी’च्या साथीने आर्थिक उन्नतीची संधी उपलब्ध झाल्याने अनेकजण या उपक्रमात सहभागी होत आहेत. ‘सकाळ मनी’ ही खास गुंतवणुकीसाठीची नवी वेबसाइट (www.sakalmoney.com) सुरू झाली असून, ती मराठी; तसेच इंग्रजी अशा दोन भाषांत कार्यरत असल्याने समाजाच्या सर्व स्तरांतील नागरिकांना त्याचा लाभ घेता येत आहे. याद्वारे सुरवातीला म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध झाली आहेच; त्याचबरोबर म्युच्युअल फंडासह पर्सनल फायनान्स क्षेत्रातील घटना-घडामोडींच्या बातम्या आणि तज्ज्ञांचे लेखही वाचायला मिळत आहेत. 

गुंतवणूक प्रतिनिधींना संधी 
अलीकडच्या काळात म्युच्युअल फंडाकडे गुंतवणूकदारांचा वाढलेला कल लक्षात घेऊन अल्पबचत प्रतिनिधी, विमा प्रतिनिधी, कंपनी एफडी एजंट, पिग्मी एजंटांना म्युच्युअल फंड या गुंतवणूक प्रकारासाठी काम करण्याची आणि उत्पन्न मिळविण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्यासाठी आवश्‍यक ती पात्रता परीक्षा आणि प्रशिक्षणाच्या मार्गदर्शनाची साथ ‘सकाळ मनी’कडून मिळणार आहे. या प्रतिनिधींच्या माध्यमातूनच गुंतवणूकदारांपर्यंत पोचण्याचा ‘सकाळ मनी’चा मानस आहे.

यासंदर्भात अधिक माहितीसाठी फक्त कार्यालयीन वेळेत (सकाळी दहा ते सायंकाळी पाच) पुणे - ९५९५९८२३३७, मुंबई - ९३२२६६३२५५, नाशिक - ९९६०९१६८३५, कोल्हापूर - ७४४७४८३३८८ या क्रमांकावरही संपर्क साधता येईल. तसेच ९८८१०९९२०० या क्रमांकावर फक्त मिस्ड कॉल देता येऊ शकेल.

Web Title: sakal money investment economic