‘सकाळ मनी’च्या वतीने म्युच्युअल फंडावर सेमिनार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसंदर्भात जनजागृती करण्यासाठी ‘सकाळ मनी’ आणि आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड यांच्या वतीने ‘धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड’ या सेमिनारचे नुकतेच चिंचवडमध्ये आयोजन करण्यात आले होते. सर्व वयोगटांतील नागरिकांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बॅंक किंवा पोस्टातील ठेवी, सोने, रिअल इस्टेट या पर्यायांच्या तुलनेत म्युच्युअल फंडाकडे गुंतवणूकदारांचा वाढलेला कल यानिमित्ताने लक्षात येऊ लागला आहे. 

येत्या १४ जुलै रोजी खास सेमिनार
‘पारंपरिक कमी परतावा देणाऱ्या साधनांमध्ये गुंतवणूक विरुद्ध अधिक चांगला परतावा देणाऱ्या साधनांमध्ये गुंतवणूक’ या विषयावरील पुढील कार्यक्रम येत्या १४ जुलै रोजी पुण्यातील गणेश कला-क्रीडा रंगमंच (नेहरू स्टेडियमजवळ, स्वारगेट) येथे आयोजित करण्यात येणार आहे. म्युच्युअल फंड क्षेत्रातील मान्यवर व नामवंत तज्ज्ञ या वेळी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची संधी कोणाकोणाला असते, या गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक का केली पाहिजे, त्याचे फायदे काय आहेत आदी तपशीलवार माहिती मिळण्याची संधी तमाम नागरिकांना मिळणार आहे. या कार्यक्रमाबाबतचे अधिक तपशील पुढील सोमवारच्या अंकात प्रसिद्ध केले जातील. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून, त्याला उपस्थित राहण्यास इच्छुक असलेल्यांना ७४४७४-५०१२३ या क्रमांकावर फक्त मिस्ड कॉल द्यावा लागणार आहे. त्यानंतर त्यांना नावनोंदणी झाल्याचा ‘एसएमएस’ पाठविला जाणार आहे. ‘प्रथम नोंदणी करणाऱ्यांना प्राधान्य’ या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे सुवर्णसंधीचा लाभ सर्वसामान्य नागरिकांबरोबरच इंडिपेंडंट फायनान्शियल ॲडव्हायझर्सनी (आयएफए) घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

‘सकाळ मनी’ची साथ हवीय?
अल्पबचत प्रतिनिधी, विमा प्रतिनिधी, कंपनी एफडी एजंट, पिग्मी एजंटांना म्युच्युअल फंड या गुंतवणूक प्रकारासाठी काम करण्याची आणि उत्पन्न मिळविण्याची संधी प्राप्त झाली आहे. ‘सकाळ मनी’सोबत एजंट म्हणून काम करण्याची इच्छा असलेल्यांनी ९८८१०-९९२०० या क्रमांकावर, तर गुंतवणूकदारांनी ७३५०८-७३५०८ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा. त्यानंतर त्यांना स्वतंत्रपणे संपर्क साधला जाणार आहे.

Web Title: sakal money mutual fund seminar