‘सकाळ मनी’ची जनजागृती मोहीम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

प्रत्येकाच्या गरजेनुरूप गुंतवणुकीचे नियोजन करून प्रत्यक्ष म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ‘सकाळ मनी’च्या उपक्रमाची आता राज्यभर चर्चा सुरू झाली असून, वाचक, गुंतवणूकदार आणि स्वतंत्र आर्थिक सल्लागारांकडून (इंडिपेंडंट फायनान्शियल ॲडव्हायझर्स-IFA) मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.  

प्रत्येकाच्या गरजेनुरूप गुंतवणुकीचे नियोजन करून प्रत्यक्ष म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ‘सकाळ मनी’च्या उपक्रमाची आता राज्यभर चर्चा सुरू झाली असून, वाचक, गुंतवणूकदार आणि स्वतंत्र आर्थिक सल्लागारांकडून (इंडिपेंडंट फायनान्शियल ॲडव्हायझर्स-IFA) मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.  

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसंदर्भात जनजागृती करण्यासाठी ‘सकाळ मनी’ आणि आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड यांच्या वतीने ‘धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड’ या सेमिनारचे प्रथमच आयोजन करण्यात येत आहे. ‘पारंपरिक कमी परतावा देणाऱ्या साधनांमध्ये गुंतवणूक विरुद्ध अधिक चांगला परतावा देणाऱ्या साधनांमध्ये गुंतवणूक’ या विषयावर आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचे अभय लांडगे; तसेच ‘सकाळ मनी’चे रोशन थापा मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम चिंचवडमधील दर्शन हॉलमध्ये (पिंपरी-चिंचवड लिंक रोड) येत्या शनिवारी (ता. ३० जून) दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत होणार आहे. हॉलची आसनसंख्या मर्यादित असल्याने ‘प्रथम नोंदणी करणाऱ्यांना प्राधान्य’ या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून, त्याला उपस्थित राहण्यास इच्छुक असलेल्यांना ७४४७४-५०१२३ या क्रमांकावर फक्त मिस्ड कॉल द्यावा लागणार आहे. त्यानंतर त्यांना त्यांची नावनोंदणी झाल्याचा ‘एसएमएस’ पाठविला जाणार आहे.  ‘सकाळ मनी’साठी काम करणाऱ्या इंडिपेंडंट फायनान्शियल ॲडव्हायझर्सना (IFA) देखील या कार्यक्रमासाठी खास निमंत्रित करण्यात येत आहे. आपल्या गुंतवणूकदारांना अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी त्यांना या कार्यक्रमाचा उपयोग होणार आहे. 

अल्पबचत प्रतिनिधी, विमा प्रतिनिधी, कंपनी एफडी एजंट, पिग्मी एजंटांना म्युच्युअल फंड या गुंतवणूक प्रकारासाठी काम करण्याची आणि उत्पन्न मिळविण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्यासाठी मार्गदर्शनाची साथ ‘सकाळ मनी’कडून मिळणार आहे. ‘सकाळ मनी’सोबत एजंट म्हणून काम करण्याची इच्छा असलेल्यांनी ९८८१०-९९२०० या क्रमांकावर, तर गुंतवणूकदारांनी ७३५०८-७३५०८ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा.

Web Title: sakal money Public awareness campaigns