सॅमसंग गॅलेक्सी एस8 आणि गॅलेक्सी एस8+ भारतात दाखल

वृत्तसंस्था
बुधवार, 19 एप्रिल 2017

नवी दिल्ली: स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगची 'गॅलेक्सी एस8' आणि 'गॅलेक्सी एस8+' ही दोन नवी मॉडेल्स आज बाजारात सादर झाली आहेत. इन्फिनिटी डिसप्ले, उत्कृष्ट बॅटरी लाईफ आणि कॅमेरासारखी वैशिष्टे असणाऱ्या फोनची पुर्वनोंदणी आजपासून सुरु झाली असून 5 मेपर्यंत सुरु राहणार आहे. गॅलेक्सी एस8 ची किंमत 57,900 रुपये असून गॅलेक्सी एस8 फोनची किंमत 64,900 रुपयेएवढी आहे.

"गॅलेक्सी एस8 आणि गॅलेक्सी एस8+ सादर करीत कंपनीने पारंपरिक तंत्रज्ञानाची मर्यादा ओलांडली आहे. या दोन स्मार्टफोन्सच्या लाँचनंतर आमची ग्रेट इनोव्हेशन आणि आकर्षक डिझाईनची परंपरा आणि मेक फॉर इंडियाचे वचन आणखी मजबूत झाले आहे.", असे सॅमसंग साऊथवेस्ट एशियाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एच सी हाँग म्हणाले.

सॅमसंगची काही महिन्यांपुर्वी सादर झालेली 'सॅमसंग पे' सेवा दोन्ही स्मार्टफोन्समध्ये इन-बिल्ट उपलब्ध आहे. गॅलेक्सी एस8 च्या स्क्रीनचा आकार 5.8 इंच असून गॅलेक्सी एस8+चा आकार 6.2 इंचएवढा आहे. कंपनीने फिजिकल होम बटण हटवत आता यासाठी डिस्प्लेवर इनव्हिजिबल होम बटण दिलं आहे. आयरिस, फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेशियल रिकग्निशनसारखे बायोमेट्रिक तंत्रज्ञान हे या स्मार्टफोनचे खास वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे या फोन्समध्ये स्नॅपड्रॅगन 835 आणि किंवा सॅमसंगचं एक्सीनॉस प्रोसेसरदेखील उपलब्ध आहे.

Web Title: Samsung Galaxy S8, S8+ launched in India starting at Rs 57,900