सॅमसंगचे आता फक्त 4जी स्मार्टफोन मिळणार

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

कोलकता : कोरियातील आघाडीची इलेक्‍ट्रॉनिक्‍स कंपनी सॅमसंग भारतात केवळ 4 जी/व्होल्ट स्मार्टफोन सादर करणार आहे. बाजारपेठेतील बदलत्या परिस्थितीनुसार कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

कोलकता : कोरियातील आघाडीची इलेक्‍ट्रॉनिक्‍स कंपनी सॅमसंग भारतात केवळ 4 जी/व्होल्ट स्मार्टफोन सादर करणार आहे. बाजारपेठेतील बदलत्या परिस्थितीनुसार कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

सॅमसंग इंडियाचे उपाध्यक्ष (मोबाईल व्यवसाय) मनू शर्मा म्हणाले, ""देशातील स्मार्टफोन वापरणाऱ्या ग्राहकांपैकी 80 टक्के 4 जी सेवेकडे वळले आहेत. यामुळे या विभागात भविष्यात स्मार्टफोन सादर करण्यात येतील. स्मार्टफोनचे उत्पादन वाढविण्यासाठी कंपनी नोएडा येथील प्रकल्पात दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. भारतातील स्मार्टफोन बाजारपेठेत कंपनीचा हिस्सा 48.6 टक्के आहे. भारतात सॅमसंगचे 4 जी असलेले 25 स्मार्टफोन बाजारपेठेत आहेत.''

"गॅलेक्‍सी नोट 7'बद्दल बोलताना ते म्हणाले, "" या स्मार्टफोनचे उत्पादन तसेच, विक्री जागतिक पातळीवर कंपनीने बंद केली आहे. भारतात हा स्मार्टफोन सादर करण्यात आला नव्हता. ग्राहकांना दुसरीकडून हा स्मार्टफोन घेतला असल्यास त्यांना कंपनीकडून परतावा मिळेल. हा स्मार्टफोन खरेतर भारतीय बाजारपेठेत या महिन्याच्या अखेरीस दाखल होण्याचे नियोजन होते. त्याचे बुकींग आता "एस 7 एज' आणि "एस 7'साठी देण्यात येईल,'' असे शर्मा यांनी नमूद केले. या वेळी शर्मा यांनी "माय गॅलेक्‍सी ऍप'चे अनावरण केले.

Web Title: samsung launches 4g smartphones in India