मोठ्या स्क्रीनच्या टीव्हींवर ‘सॅमसंग’चा यापुढेही भर

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 जून 2017

पुणे:  टीव्हीच्या ग्राहकांच्या आवडीनिवडीत बदल होत चालला असून, मोठ्या स्क्रीनच्या (पॅनल) टीव्हींना मागणी वाढत चालली आहे. हीच बाब लक्षात घेऊन या पुढच्या काळात 40 इंच व त्याहून मोठ्या स्क्रीनच्या टीव्हींच्या निर्मितीवर "सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍स'चा भर असेल, अशी माहिती कंपनीचे सरव्यवस्थापक पीयूष कुन्नापल्लील यांनी येथे दिली.

घरातील टीव्ही पाहण्याचा अनुभव अधिक समृद्ध करताना कंपनीने नवा अत्याधुनिक क्‍यू एलईडी टीव्ही पुण्याच्या बाजारपेठेत सादर केला. त्याप्रसंगी श्री. कुन्नापल्लील बोलत होते. याप्रसंगी कंपनीचे उपाध्यक्ष राजीव भुतानी उपस्थित होते. क्‍यू8 आणि क्‍यू7 अशा श्रेणींमध्ये आणि 55 इंच, 65 इंच, 75 इंच, 88 इंच अशा मोठ्या आकाराचे नवे एलईडी टीव्ही कंपनीने सादर केले आहेत.

चित्राचा उच्च दर्जा, आकर्षक डिझाईन आणि स्मार्ट वैशिष्ट्यांमुळे प्रिमियम सेगमेंटमधील टीव्हींची मागणी वाढत आहे, असे निरीक्षण नोंदवून श्री. कुन्नापल्लील म्हणाले, की सध्या 30-32 इंची टीव्हींची मागणी स्थिर राहताना दिसत असून, त्यापेक्षा मोठ्या आकाराच्या विशेषतः 40 इंचाहून अधिक आकाराच्या टीव्हींना ग्राहकांची पसंती दिसून येत आहे. आगामी काळात अशा टीव्हींच्या बाजारपेठेतील आमचा हिस्सा आणखी वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी क्‍यू एलईडी टीव्हीची आम्हाला मदत होईल. महत्त्वाचे म्हणजे या टीव्हींची निर्मिती भारतातील प्रकल्पांत केली जात आहे.

या वर्षांच्या उत्तरार्धात "सॅमसंग'ने "द फ्रेम' नावाचे खास वैशिष्ट्य असलेला टीव्ही बाजारात आणण्याचे ठरविले आहे, अशी माहितीही या वेळी देण्यात आली.

Web Title: Samsung's focus is still on the big screen TVs