सेबीच्या निर्णयाविरोधात सहारा करणार नव्याने अपील

वृत्तसंस्था
सोमवार, 30 एप्रिल 2018

सिक्युरिटीज अॅपेलेट ट्रिब्युनलने सहारा समूहाला सेबीच्या निर्णयाविरोधातील आपले अपील मागे घेण्याची परवानगी दिली आहे. सेबीने सहारा समूहाला आपल्या सर्व म्युच्यअल फंड योजना बंद करण्याचे आदेश दिले होते.

मुंबई : सेबीने सहारा म्युच्युअल फंडाला आपल्या सर्व योजना बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सहारा समूहाने सिक्युरिटीज अॅपेलेट ट्रिब्युनलकडे धाव घेतली होती. सिक्युरिटीज अॅपेलेट ट्रिब्युनलने सहारा समूहाला सेबीच्या निर्णयाविरोधातील आपले अपील मागे घेण्याची परवानगी दिली आहे. सेबीने सहारा समूहाला आपल्या सर्व म्युच्यअल फंड योजना बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यासंदर्भात सहारा समूह सेक्युरिटीज अॅपेलेट ट्रिबूनलकडे दाद मागितली होती. सेक्युरिटीज अॅपेलेट ट्रिबूनलने यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, सहारा समूहाला आपले अपील मागे घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

त्यायोगे सहारा समूहाला नव्याने आपले अपील दाखल करता येणार आहे. सेक्युरिटीज अॅपेलेट ट्रिबूनलने असेही सांगितले आहे की, नवीन अपील दाखल करण्यासाठी सहाराला 2 मे 2018 पर्यंतची मूदत देण्यात आली आहे. जर नवीन अपील जर 2 मे 2018 पर्यंत दाखल करण्यात आले तर 3 मे 2018 रोजी अपीलाला प्रवेश देण्यात येईल. 

याआधी सेबीने सहारा समूहाला, सहारा टॅक्स गेन फंडाव्यतिरिक्त इतर योजना 21 एप्रिल 2018 बंद करण्याचे आदेश दिले आहेत. सहारा टॅक्स गेन फंड या योजनेला 27 ऑगस्ट 2018 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. सहारा म्युच्युअल फंड कंपनीला नोंदणीचे प्रमाणपत्र 27 ऑगस्ट 2018 पर्यंत सेबीकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

Web Title: SAT allows Sahara to withdraw appeal against Sebi order in MF matter