तेल उत्पादन कपातीसाठी सौदी अरेबियाचा पुढाकार

पीटीआय
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

अबुधाबी - खनिज तेलाच्या भावातील घसरण रोखण्यासाठी तेल उत्पादक देशांनी उत्पादन दररोज दहा लाख बॅरलने कमी करावे, असे आवाहन सौदी अरेबियाच्या ऊर्जामंत्र्यांनी केले.  

अबुधाबी - खनिज तेलाच्या भावातील घसरण रोखण्यासाठी तेल उत्पादक देशांनी उत्पादन दररोज दहा लाख बॅरलने कमी करावे, असे आवाहन सौदी अरेबियाच्या ऊर्जामंत्र्यांनी केले.  

येथील ऊर्जा परिषदेत सोमवारी बोलताना सौदी अरेबियाचे ऊर्जामंत्री खालिद अल-फलिह म्हणाले, ‘‘आमच्या हाती बाजारपेठेचे तांत्रिक विश्‍लेषण नुकतेच आले आहे. यानुसार बाजारपेठेतील घसरण रोखण्यासाठी उत्पादनात दररोज दहा लाख बॅरलची कपात आवश्‍यक आहे. बाजार स्थिर ठेवण्यासाठी पुढील महिन्यात सौदी अरेबिया तेल उत्पादनात दररोज ५ लाख बॅरल कपात करेल.’’
खनिज तेल ७१.६२ डॉलरवर खनिज तेलाच्या उत्पादनात कपात करण्याचा निर्णय सौदी अरेबियाने घेतल्याने खनिज तेल वधारून प्रतिबॅरल ७१.६२ डॉलरपर्यंत गेले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saudi Arabia initiatives for oil production cut