सौदी अरेबिया भारतातील पेट्रोलियम क्षेत्रात करणार मोठी गुंतवणूक

सौदी अरेबिया भारतातील पेट्रोलियम क्षेत्रात करणार मोठी गुंतवणूक

नवी दिल्ली: सौदी अरेबियाने भारतातील पेट्रोलियम क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याची तयारी दाखविली आहे. सौदी अरेबिया हा जगातील सर्वात मोठी कच्च्या तेलाचे उत्पादन करणारा देश आहे. भारतातील पेट्रोलियम उत्पादनांच्या वितरणात तसेच कच्च्या तेलाच्या साठवणूकीच्या क्षेत्रात गुंतवणूक करण्याची तयारी सौदी अरेबियाने दाखवली आहे. त्याचबरोबर सौदी अरेबियाने भारताला पुरेसा कच्च्या तेलाचा पुरवठा करण्याचीही हमी दिली आहे. सौदी अरेबियाच्या मंत्र्यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे स्पष्ट केले आहे. 

सध्या कच्च्या तेलाची आंतराराष्ट्रीय बाजारपेठतील किंमत 81 डॉलर प्रति बॅरलवर पोचली आहे. अमेरिकेने इराणवर घातलेले निर्बंध त्याचबरोबर आंतराराष्ट्रीय बाजारात कडाडलेले कच्च्या तेलाचे भाव यामुळे भारत यासंदर्भातील वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी करत मोर्चेबाधणी करतो आहे. ऊर्जेच्या क्षेत्रात भारत एकाच स्त्रोतावर अवलंबून राहू शकत नाही असे मत केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी व्यक्त केले आहे. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमतीचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो आहे. सौदी अरेबियाने याआधी भारतात रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पात मोठी गुंतवणूक केली आहे. भारतात आणखी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची सौदी अरेबियाची तयारी आहे. सौदी अरामको

सौदी अरेबियाच्या अरामको (एआरएएमसीओ) आणि युएईच्या अॅडनॉक (एडीएनओसी) या कंपन्यांनी भारतातील गुंतवणूकीला मान्यता दिली आहे. अरामको आणि अॅडनॉक या कंपन्या महाराष्टातील रत्नागिरीच्या रिफायनरीत 44 बिलियन डॉलर्सची (जवळपास 3 लाख कोटी रुपये) गुंतवणूक करणार आहेत. कच्चे तेल शुद्धीकरण क्षेत्रातील ही भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी परकी गुंतवणूक असणार आहे. "2040 सालापर्यंत भारतातील कच्च्या तेलाची मागणी 10 मिलियन बॅरल प्रति दिन इतका होणार आहे. त्यामुळेच भारताला कच्च्या तेलाचा पुरेसा पुरवठा होणे आवश्यक आहे. आम्ही भारताच्या पेट्रोलियम बाजारपेठेला सहाय्यक ठरण्याच्या दृष्टीकोनातून आमची गुंतवणूक करू. यामुळे भारतीय कंपन्यांचेसुद्धा हित साधले जाईल", असे मत सौदी अरामकोचे सीईओ अमीन एच नासेर यांनी याआधीच व्यक्त केले आहे.

रत्नागिरीच्या रिफायनरीतून 60 मिलियन मेट्रिक टन पेट्रोलियमचे उत्पादन घेतले जाणार आहे. या रिफायनरीचा पहिला टप्पा 2022 साली कुतीशील होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पात भारताच्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदूस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन यांचा एकत्रितपणे 50 टक्का हिस्सा असणार आहे. तर सौदी अरेबियाची अरामको (एआरएएमसीओ) आणि युएईची अॅडनॉक (एडीएनओसी) यांचा प्रत्येकी 25 टक्के वाटा असणार आहे. या प्रकल्पासाठी स्थानिक कोकणी माणसाकडून विरोध होतो आहे. या प्रकल्पामुळे प्रस्थावित जागेच्या परिसरातील आंबा आणि काजूच्या उच्च उत्पादक फळबागा नष्ट होतील या कारणास्तव हा विरोध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com