एसबीआयच्या 1603 शाखा बंद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

औरंगाबाद - केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करीत सात सहयोगी बॅंकांचे भारतीय स्टेट बॅंकेत विलिनीकरण केले; मात्र विलिनीकरणाच्या एका वर्षांतच 1,603 शाखा बंद करण्याची वेळ बॅंकेवर आली. प्रशासनावर आलेला अतिरिक्‍त ताण, नियोजनाच्या अभावामुळे देशभरातील या शाखा बंद कराव्या लागल्या. एवढेच नाही, तर 241 करन्सी चेस्टही एसबीआयने बंद केल्याची माहिती बॅंकेच्या वार्षिक अहवालातून समोर आली आहे. 

स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या एक एप्रिल 2017 ला 24 हजार 17 शाखा होत्या. त्या 31 मार्च 2018 पर्यंत 22 हजार 414 वर आल्या. यातील 1603 शाखा बॅंकेला बंद कराव्या लागल्या. शिवाय पंधरा हजार कर्मचारी कमी झाले. त्या तुलनेत नवी भरती केवळ 3 हजार 211 एवढीच करण्यात आली. एकीकडे केंद्र सरकार विविध योजना बॅंकांमार्फत राबवीत आहे. दुसरीकडे बॅंकेच्या रिक्‍त जागा भरण्यात येत नाहीत. विलिनीकरण झालेल्या बॅंकांचे खातेदार आणि नियमित खातेदारांचे काम सांभाळत विविध योजना राबविण्याचे काम एसबीआयला करावे लागते. यामुळे ग्राहकांना मिळणाऱ्या सुविधेवर परिणाम दिसून येत आहे. यामुळेच या शाखा बंद पडल्या. आणखी शाखा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. बंद पडत असलेल्या शाखा वाचवत पद भरतीसह सुविधांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशनचे सहसचिव देविदास तुळजापूरकर यांनी सांगितले. 

बॅंक शाखा-------2017 ---------------2018------------- घटलेली संख्या 
देशभरात-------- 24,017------------- 22,414----------- 1603 
कर्मचारी संख्या---2,79,803------------ 2,64,041------- 15,762 
नवीन भरती ----------------------------- 3211----------- 12551 

शाखा बंद, भरती कमी याकडे लक्ष न देता सरकार आणखी काही बॅंकांच्या विलिनीकरणाची भाषा करीत आहे. ज्या बॅंका आहे, त्या सुव्यवस्थित कशा चालतील, त्यांच्या समस्या सोडविण्याची गरज आहे. अन्यथा पुन्हा काही शाखा बंद पडण्यासाठी वेळ लागणार नाही. 
- देविदास तुळजापूरकर, सहसचिव, एआयबीईआय 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SBI 1603 branches closed