‘एसबीआय’चा जगातील टॉप 50 बँकांमध्ये समावेश

वृत्तसंस्था
शनिवार, 1 एप्रिल 2017

एसबीआयमध्ये आज (शनिवार) स्टेट बँक आॅफ हैदराबाद, स्टेट बँक आॅफ त्रावणकोर, स्टेट बँक आॅफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक आॅफ म्हैसूर आणि स्टेट बँक आॅफ पतियाळा या एसबीआयच्या पाच सहयोगी बँकांचे विलीनीकरण झाले आहे.

नवी दिल्ली - देशातील सर्वांत मोठी बँक असलेल्या मुख्य स्टेट बँकेत (एसबीआय) पाच सहयोगी बँकांचे विलीनीकरण झाले आहे. त्यामुळे आता एसबीआय जगातील 45 व्या क्रमांकाची सर्वांत मोठी बॅंक बनली आहे.

एसबीआयमध्ये आज (शनिवार) स्टेट बँक आॅफ हैदराबाद, स्टेट बँक आॅफ त्रावणकोर, स्टेट बँक आॅफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक आॅफ म्हैसूर आणि स्टेट बँक आॅफ पतियाळा या एसबीआयच्या पाच सहयोगी बँकांचे विलीनीकरण झाले आहे. विलीनीकरणानंतर आता सर्व बँकांची सर्व प्रकारची मालमत्ता एसबीआयकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. तसेच पाचही सहयोगी बँकांचा कर्मचारी वर्ग आणि बँकेचे ग्राहक देखील मुख्य एसबीआयमध्ये हस्तांतरित झाले आहेत.

पाचही बँकांचे मुख्य एसबीआयमध्ये विलीनीकरण झाल्यानंतर एसबीआयचा ताळेबंद 41 लाख कोटी रुपयांवर पोचला आहे. आता देशभरात बॅंकेच्या 22,500 शाखा, भारतभर विविध राज्यांमध्ये 58,000 एटीएम आणि ग्राहकांची संख्या 50 कोटींवर पोचली आहे.

शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात स्टेट बॅंकेचा शेअर 292.60 रुपयांवर व्यवहार करत 2.60 रुपयांनी वधारून बंद झाला. शेअरने इंट्राडे व्यवहारात 294.25 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. ही शेअरची वर्षभरातील उच्चांकी पातळी आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार बॅंकेचे रु.233,304.74 कोटींचे बाजारभांडवल आहे.

(अर्थविषयक अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी क्लिक करा www.sakalmoney.com)

Web Title: SBI all set to become 45th largest bank