SBI ग्राहकांनो इकडं लक्ष द्या! दोन तास 'या' सुविधा राहणार बंद

SBI ग्राहकांनो इकडं लक्ष द्या! दोन तास 'या' सुविधा राहणार बंद

नवी दिल्ली : जर आपलं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल आणि आपल्याला डिजीटल पद्धतीने बँकेचं कोणतंही काम करायचं असेल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. उद्या गुरुवारी म्हणजेच 17 जून रोजी दोन तासांसाठी बँकेच्या अनेक सेवा बंद राहणार आहेत. त्यामुळे आर्थिक व्यवहारांबाबत आपल्याला अनेक अडचणी येऊ शकतात. आपल्याला याबाबतची माहिती असायला हवी, अन्यथा ऐनवेळी अनेक घोळ होऊ शकतात. त्यामुळेच ग्राहकांना अशा अडचणी येऊ नयेत म्हणून बँकेने अलर्ट देखील दिला आहे.

SBI ने ट्विट करत दिली माहिती

SBI चे ग्राहक दोन तासांसाठी इंटरनेट बँकींग, युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (UPI), योनो आणि योनो लाईटच्या सुविधेचा लाभ घेऊ शकणार नाहीयेत. या वेळेत मेन्टेनन्सचं काम सुरु राहणार असल्याने सुविधा बंद असणार आहे. SBI ने ट्विटमध्ये म्हटलंय की, 17 जून 2021 रोजी 00.30 वाजल्यापासून ते 02.30 वाजेपर्यंत हे मेन्टेनन्सचं काम सुरु राहिलं.

SBI ने म्हटलंय की, आम्ही आमच्या ग्राहकांना विनंती करतो की त्यांनी आमच्यासोबत रहावं. आम्ही उत्तम बँकिंगचा अनुभव देण्याचा प्रयत्न करीत आहोत. 13 जून रोजी देखील SBI च्या अनेक सुविधा प्रभावित झाल्या होत्या. मे महिन्यामध्ये देखील योनो, योनो लाईट, इंटरनेट बँकींग, युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस सहित एकूणच डीजीटल प्लॅटफॉर्मवर परिणाम झाला होता.

देशात SBI च्या 22,000 हून अधिक शाखा

देशातील सर्वांत मोठी बँक SBI च्या 22,000 हून अधिक शाखा आहेत. तसेच 57,889 एटीएम आहेत. 31 डिसेंबर, 2020 च्या आकडेवारीनुसार, इंटरनेट बँकींग आणि मोबाईल बँकींगचा वापर करणाऱ्या ग्राहकांची संख्या क्रमश: 8.5 कोटी आणि 1.9 कोटी आहे. तर बँकेच्या UPI चा वापर करणाऱ्या ग्राहकांची संख्या 13.5 कोटी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com