‘एसबीआय’कडून कर्जदरात कपात जाहीर

वृत्तसंस्था
रविवार, 1 जानेवारी 2017

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बँकांना सर्वसमावेशक धोरण राबविण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद एसबीआयने ही दरकपात जाहीर केली आहे.

मुंबई: भारतीय स्टेट बँकेने(एसबीआय) ठेवींचा ओघ वाढल्याने ग्राहकांना लाभ हस्तांतरित करत आज(रविवार) कर्जदरात 0.9 टक्क्यांची कपात जाहीर केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बँकांना सर्वसमावेशक धोरण राबविण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद एसबीआयने ही दरकपात जाहीर केली आहे. बँकेचा एका दिवसासाठीचा 'एमसीएलआर' दर 8.65 टक्क्यांवरुन 7.75 टक्के झाले आहे तर तीन वर्षे मुदतीच्या कर्जाचा दर 9.05 टक्क्यांवरुन 8.15 टक्के झाला आहे.

केंद्र सरकारने पाचशे व हजारांच्या नोटा बाद केल्यानंतर एसबीआयकडे जुन्या नोटांच्या स्वरुपात 14.9 लाखांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. यामुळे बँका कर्जदरात कपात करतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षभरात रेपो दरात 1.75 टक्क्यांची कपात केली आहे. तुलनेत, बँकांकडून मात्र कर्जदरात फार कमी वेगाने कर्जदरात कपात केल्याचे दिसून आले आहे.

Web Title: SBI cuts benchmark lending rate across various tenures by 0.9 per cent