'एसबीआय'कडून ठेवी दरात कपात 

वृत्तसंस्था
बुधवार, 3 मे 2017

एक वर्षापासून 455 दिवसांसाठीच्या ठेवींवर बॅंकेकडून 6.90 टक्के व्याज दिले जात आहे. त्याचबरोबर बॅंकेने एक वर्षासाठीच्या "एमसीएलआर'वरील व्याजदरात कोणताही बदल केला नसून तो 8 टक्‍क्‍यांवर कायम आहे. 

मुंबई - भारतीय स्टेट बॅंकेने (एसबीआय) मुदत ठेवींवरील व्याजदरात अर्ध्या टक्‍क्‍याची कपात केली आहे. एक कोटीपेक्षा कमी रक्कम असलेल्या मध्यम आणि दीर्घकाळातील ठेवींवर नवे व्याजदर लागू होतील, असे बॅंकेने म्हटले आहे. 

दोन ते तीन वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर आता 6.25 टक्के व्याज मिळेल. यापूर्वी या ठेवींवर 6.75 टक्के व्याज दिले जात होते. ज्येष्ठ नागरिकांसाठी याच मुदतीसाठी 6.75 टक्के व्याज मिळणार आहे. तीन वर्षांपेक्षा अधिक आणि 10 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात 0.25 टक्‍क्‍याची कपात करून तो 6.50 टक्के केला आहे. 

एक वर्षापासून 455 दिवसांसाठीच्या ठेवींवर बॅंकेकडून 6.90 टक्के व्याज दिले जात आहे. त्याचबरोबर बॅंकेने एक वर्षासाठीच्या "एमसीएलआर'वरील व्याजदरात कोणताही बदल केला नसून तो 8 टक्‍क्‍यांवर कायम आहे. 

Web Title: SBI cuts term deposit rates by up to 50 basis points