कंपनीचे प्रवर्तक दुबई, ४१४ कोटी थकित, स्टेट बॅंक प्रतिक्षेत

SBI-Bank
SBI-Bank

कंपनीचे प्रवर्तक ४१४ कोटी घेऊन दुबईत फरार, एसबीआयसह पाच बॅंका प्रतिक्षेत

* स्टेट बॅंकेसह पाच बॅंकांचे ४१४ कोटींचे कर्ज बुडवल्याचे प्रकरण
* बॅंकेकडून तक्रार दाखल, कर्ज घेणाऱ्या कंपनीचे प्रवर्तक २०१६ पासून फरार
* राम देव इंटरनॅशनल लि. बासमती तांदूळाच्या निर्यातीच्या व्यवसायात
* सीबीआयकडे बॅंकांची तक्रार दाखल

दिल्लीस्थित बासमती तांदूळ निर्यातदारांनी स्टेट बॅंक ऑफ इंडियासह पाच इतर बॅंकांची ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम बुडवल्याची किंवा थकवल्याची तक्रार बॅंकेने सेंट्रल बुरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनकडे (सीबीआय) केली आहे. राम देव इंटरनॅशनल लि.च्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्टेट बॅंकेव्यतिरिक्त इतर पाच बॅंकांनादेखील फसवण्यात आल्याचे हे प्रकरण आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

काय आहे हे प्रकरण -
सीबीआयकडे २८ एप्रिलला राम देव इंटरनॅशनल लि.चे प्रवर्तक सुरेश कुमार, नरेश कुमार आणि संगिता यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर या तिघांविरोधात लुक आऊट सर्क्युलरदेखील काढण्यात आले आहे.

स्टेट बॅंक आणि इतर पाच बॅंकांनी राम देव इंटरनॅशनलला एकूण ४१४ कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. यात स्टेट बॅंकेचे १७३ कोटी रुपये, कॅनरा बॅंकेचे ७६ कोटी रुपये, युनियन बॅंक ऑफ इंडियाचे ६४ कोटी रुपये, सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाचे ५१ कोटी रुपये, कॉर्पोरेशन बॅंकेचे ३६ कोटी रुपये आणि आयडीबीआय बॅंकेने १२ कोटी रुपयांचे कर्ज राम देव इंटरनॅशनला दिलेले आहे. 

२०१६ मध्येच राम देव इंटरनॅशनलला दिलेल्या कर्जाचे वर्गीकरण बॅंकांनी थकित कर्जात (एनपीए) केले होते. राम देव इंटरनॅशनलचे प्रवर्तक, मालक २०१६ पासूनच फरार आहेत. एसबीआयने एक इन्स्पेक्शन केल्यानंतर ही बाब उघडीस आली होती. २५ फेब्रुवारी २०२०ला स्टेट बॅंकेने अनेक वर्ष हे कर्ज एनपीए झाल्यानंतर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार कंपनीच्या प्रवर्तकांनी त्यांच्या कंपनीच्या जुन्या कारखान्यातून सर्व यंत्र सामुग्री काढून घेतली होती आणि खोटा ताळेबंद तयार केला होता. हे करताना त्यांनी बॅंकांकडून घेतलेल्या कर्जाचा गैरवापर करत कंपनीची आर्थिक स्थिती चांगली असल्याचा देखावा निर्माण केला होता.

स्टेट बॅंकेने जेव्हा विशेष ऑडिट केले तेव्हा असे लक्षात आले की कंपनीच्या प्रवर्तकांनी अकाऊंटमध्ये हेरफेर केले आहेत. खोटा ताळेबंद तयार केला आहे आणि बेकायदेशीररित्या कारखान्यातील यंत्रे काडून घेतली आहेत. ऑगस्ट २०१६ आणि ऑक्टोबर २०१६ मध्ये स्टेट बॅंक आणि इतर पाच बॅंकांनी संयुक्तरित्या एक इन्स्पेक्शन केले होते. त्यानंतर सात ते नऊ महिन्यांनी हरियाणा पोलिसांना राम देव इंटरनॅशनलच्या कारखान्यावर देखरेख करण्यास नियुक्त करण्यात आले होते.

नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या (एनसीएलटी) २०१८ मधील आदेशानुसार त्यांना प्रवर्तक दुबईत फरार झाल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र कोविड-१९ महामारीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सीबीआयला शोध मोहिम हाती घेता आली नाही. सीबीआय आता आरोपींना समन्स बजावून कारवाईची सुरूवात करणार आहे. जर राम देव इंटनॅशनलचे प्रवर्तकांनी सीबीआयच्या तपासाला प्रतिसाद दिला नाही तरत्यांच्यावर योग्य त्या कायदेशीर कारवाईची सुरूवात करण्यात येणार आहे. 

राम देव इंटरनॅशनल लि. बासमती तांदूळाच्या निर्यातीच्या व्यवसायात आहे. कंपनी पश्चिम आशिया आणि युरोपातील देशांमध्ये बासमती तांदूळाची निर्यात करते. एसबीआयच्या तक्रारीनुसार कंपनीचे हरियाणातील कर्नाल जिल्ह्यात तीन राईस मिलिंग कारखाने आहेत आणमि आठ सॉर्टिंग आणि ग्रेडिंग युनिट आहेत. याशिवाय राम देव इंटरनॅशनल लि.ची सौदी अरेबिया आणि दुबईमधील व्यापारी कामकाजासाठी कार्यालयेदेखील आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com