“एसबीआय’च्या नफ्यात 71 टक्‍क्‍यांची वाढ

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

मुंबई : स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) तिसऱ्या तिमाहीतील निव्वळ नफ्यात 71 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत एसबीआयला 2 हजार 152 कोटी रुपयांचा नफा झाला आहे.

मुंबई : स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) तिसऱ्या तिमाहीतील निव्वळ नफ्यात 71 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत एसबीआयला 2 हजार 152 कोटी रुपयांचा नफा झाला आहे.

"एसबीआय'ने 2015-16 मधील तिसऱ्या तिमाहीत 1 हजार 259 कोटी रुपयांचा नफा नोंदविला होता. बॅंकेचे उत्पन्न तिसऱ्या तिमाहीत 75 हजार 537 कोटी रुपयांवर पोचले आहे. त्याआधीच्या वर्षात याच तिमाहीत ते 67 हजार 511 कोटी रुपये होते. थकीत कर्जांसाठी बॅंकेने केलेली तरतूद वाढून 8 हजार 942 कोटी रुपयांवर पोचली आहे. डिसेंबरअखेर बॅंकेकडे 1.08 लाख कोटी रुपयांची थकीत कर्जे आहेत. त्याआधीच्या वर्षामध्ये याच कालावधीत थकीत कर्जे 72 हजार 791 कोटी रुपयांची होती. बॅंकेच्या एकूण थकीत कर्जांचे प्रमाण 4.24 टक्‍क्‍यांवर पोचले आहे. त्याआधीच्या वर्षात याच काळात ते 2.89 टक्के होते. "एसबीआय'च्या एकत्रित नफ्यात दुप्पट वाढ झाली आहे. तिसऱ्या तिमाहीत "एसबीआय'ला 2 हजार 610 कोटी रुपयांचा नफा झाला असून, त्याआधीच्या वर्षातील याच तिमाहीत तो 1 हजार 115 कोटी रुपये होता.

सध्या मुंबई शेअर बाजारात एसबीआयचा शेअर 279 रुपयांवर व्यवहार करत असून तो 3.15 रुपयांनी म्हणजेच 1.14 टक्क्यांनी वधारला आहे. शेअरने . एक रुपया दर्शनी किंमत असलेल्या शेअरने वर्षभरात 148.30 रुपयांची नीचांकी तर 288.50 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे.  सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार बॅंकेचे बाजारभांडवल रु.223,537.20 कोटींवर पोचले आहे.

Web Title: sbi profit increased by 71 percent