"एसबीआय'चे गृहकर्ज स्वस्त होणार

"एसबीआय'चे गृहकर्ज स्वस्त होणार

मुंबई:भारतीय स्टेट बॅंकेने गृहकर्जाचा दर रेपो दराशी संलग्न करण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे नजीकच्या काळात बॅंकेच्या गृहकर्जाच्या दरात कपात होण्याची शक्‍यता आहे. रिझर्व्ह बॅंकेने मागील चार पतधोरणात रेपो दर 1.10 टक्‍क्‍याने कमी केला आहे; मात्र त्यातून एसबीआयच्या गृहकर्जात फारशी कपात झाली नाही. परिणामी कर्जदारांना चढ्या दराने परतफेड करावी लागत आहे.

बॅंकेकडे पुरेशा प्रमाणात रोकड उपलब्धता आहे. मागील नऊ आठवड्यांपैकी दोन आठवडे वगळल्यास बॅंकेकडील रोकड तरलता सरासरी एक लाख कोटींच्या पुढे असल्याचे एसबीआयचे प्रमुख रजनीश कुमार यांनी सांगितले. ते म्हणाले, गृहकर्जाचा दर रेपो दराशी संलग्न करण्याबाबत बॅंकेकडून विचार केला जात आहे. ज्यामुळे ग्राहकांना कमी दरात गृहकर्ज मिळेल, असे कुमार यांनी सांगितले. याबाबत निर्णय झाल्यास गृहकर्जाचा दर 0.85 टक्के कमी होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. रिझर्व्ह बॅंकेचा रेपो दर 5.40 टक्के आहे.

त्यावर बॅंका 2.25 टक्के मार्जिन ठेवतात. रेपो दराशी संलग्न केल्यास एसबीआयचा गृहकर्जाचा दर 8.05 ते 8.20 टक्‍क्‍याच्या दरम्यान राहण्याची शक्‍यता आहे. सध्या बॅंकेकडून "एमसीएलआर'ने गृहकर्ज दिले जाते. ज्याचा दर 8.35 ते 8.90 टक्‍क्‍यांच्या दरम्यान आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com