स्टेट बँकेच्या व्याजदरात उद्यापासून होणार बदल 

मंगळवार, 30 एप्रिल 2019

सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेली स्टेट बँक अर्थात एसबीआय उद्यापासून (एक मे) मुदत ठेवी आणि कर्जांवरील व्याजाचे दर रिझर्व्ह बँकेच्या बेंचमार्कशी जोडणार आहे.

मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेली स्टेट बँक अर्थात एसबीआय उद्यापासून (एक मे) मुदत ठेवी आणि कर्जांवरील व्याजाचे दर रिझर्व्ह बँकेच्या बेंचमार्कशी जोडणार आहे. यामुळे भविष्यात रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात बदल करण्यात आल्यास त्याचा थेट परिणाम एसबीआयच्या व्याजदरावर होणार आहे. 
म्हणजेच रेपो दरातील होणाऱ्या बदलांसह मुदत ठेवी आणि कर्जांवरील व्याजदरात देखील बदल होणार आहे.

रेपो दराशी बँकेने व्याजदर थेट संलग्न केल्याने खातेधारकांना बचत खात्यातील रकमेवर जादा व्याज मिळण्याची शक्यता आहे. मात्र खातेदाराच्या बँक खात्यामध्ये एक लाख रुपयांपेक्षा अधिक शिल्लक रक्कम असेल त्यांनाच या नियमाचा फायदा मिळणार आहे.