बडोदा, देना, विजया बॅंकांच्या  विलीनीकरणाचा मार्ग मोकळा 

बडोदा, देना, विजया बॅंकांच्या  विलीनीकरणाचा मार्ग मोकळा 

सर्वोच्च न्यायालयाने सर्व याचिका फेटाळल्या 
नवी दिल्ली:  बॅंक ऑफ बडोदामध्ये देना आणि विजया बॅंकेच्या विलीनीकरणाविरुद्ध बॅंक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी दाखल केलेल्या याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या. त्यामुळे या बॅंकांचे विलीनीकरण होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आर. एफ. नरिमन व विनीत शरण यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने या विलीनीकरणाला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या सर्व याचिका फेटाळण्यात आल्याचे स्पष्ट केले. तत्पूर्वी या विलीनीकरणाचा बॅंक कर्मचाऱ्यांवर कसा परिणाम होत आहे, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. त्यावर वकील श्‍याम दिवाण यांनी विलीनीकरणानंतर या कर्मचाऱ्यांना कपातीचा फटका बसेल, असे सांगितले. 

दरम्यान, हे विलीनीकरण कायदे व नियमांच्या चौकटीतच होत आहे, संबंधित बॅंकांच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या अटी व नियम विलीनीकरणानंतरही कायम राहणार असून, कर्मचाऱ्यांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही, असे बॅंक ऑफ बडोदाची बाजू मांडणारे वकील मुकूल रोहतगी यांनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com