पैशाच्या गोष्टी: शोध ‘मल्टिबॅगर्स’चा!

अतुल सुळे
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

अलीकडेच मर्चंट नेव्हीमधून निवृत्त झालेले नातलग भेटायला आले होते. त्यांच्या मुंबईतील 34 वर्षांपूर्वी घेतलेल्या घराचा आता पुनर्विकास होणार आहे. या घराबाबतचा एक सुरस किस्सा त्यांनी सांगितला. 1980 मध्ये ते एका खासगी शिपिंग कंपनीत नोकरीला होते. दोन वर्षे सतत समुद्रावर राहून ते भारतात परत आले. तेव्हा त्यांना कळले, की कंपनीने किनाऱ्यावर काम करणाऱ्या स्टाफला गृहकर्जे दिली होती व ते भारताबाहेर असल्याने त्यांना गृहकर्ज मिळू शकले नाही. कोणीतरी "एचडीएफसी'चे नाव सुचविले. "एचडीएफसी'ने सांगितले, की गृहकर्ज हवे असल्यास त्यांचे शेअर खरेदी करावे लागतील. म्हणून त्यांनी 10 शेअर (दर्शनीमूल्य रु. 100) रु.

अलीकडेच मर्चंट नेव्हीमधून निवृत्त झालेले नातलग भेटायला आले होते. त्यांच्या मुंबईतील 34 वर्षांपूर्वी घेतलेल्या घराचा आता पुनर्विकास होणार आहे. या घराबाबतचा एक सुरस किस्सा त्यांनी सांगितला. 1980 मध्ये ते एका खासगी शिपिंग कंपनीत नोकरीला होते. दोन वर्षे सतत समुद्रावर राहून ते भारतात परत आले. तेव्हा त्यांना कळले, की कंपनीने किनाऱ्यावर काम करणाऱ्या स्टाफला गृहकर्जे दिली होती व ते भारताबाहेर असल्याने त्यांना गृहकर्ज मिळू शकले नाही. कोणीतरी "एचडीएफसी'चे नाव सुचविले. "एचडीएफसी'ने सांगितले, की गृहकर्ज हवे असल्यास त्यांचे शेअर खरेदी करावे लागतील. म्हणून त्यांनी 10 शेअर (दर्शनीमूल्य रु. 100) रु. 97.50 भावाने खरेदी केले. नंतर तीन वर्षांनी घरसंशोधन पूर्ण झाल्यावर कर्ज न घेता त्यांनी पैसे गोळा करून घर घेतले. 1980 मध्ये खरेदी केलेल्या "एचडीएफसी'च्या 10 शेअरबद्दल ते विसरूनही गेले. गेल्या 36 वर्षांत "एचडीएफसी'च्या त्या शेअरचे आधी 10 रुपये व नंतर 2 रुपये दर्शनी मूल्याच्या शेअरमध्ये विभाजन झाले, शिवाय कंपनीने वेळोवेळी बोनसही जाहीर केला. तसेच त्यांना एचडीएफसी बॅंकेचे शेअरही मिळाले. आज त्यांच्याकडे "एचडीएफसी'चे 2900 व बॅंकेचे 1530 शेअर आहेत, ज्यांचे बाजारमूल्य रु. 60 लाख आहे. "एचडीएफसी'ने त्या वेळी त्यांना गृहकर्जाला नाही म्हटले असेल; परंतु आज पुण्यात चांगले घर घेण्याइतका पैसा त्यांच्याच शेअर्सनी नक्कीच मिळवून दिला! याला म्हणतात "मल्टिबॅगर शेअर'! या घटनेच्या निमित्ताने मल्टिबॅगर शेअर कसा शोधावा याबाबत "मायक्रोकॅप क्‍लब'चे संस्थापक श्‍यान कॅसेल यांनी सांगितलेली काही मार्गदर्शक तत्वे समजून घेतली पाहिजेत. ती अशी-
1) गुंतवणुकीसाठी शक्‍यतो छोटी कंपनी निवडावी.
2) कंपनीचा संस्थापक उत्साही, हुशार व दूरदृष्टीचा असावा.
3) कंपनी एखाद्या उदयोन्मुख क्षेत्रातील "लीडर' असावी.
4) कंपनी भरपूर नफा कमविणारी व कर्जमुक्त असावी.
5) या कंपनीत संस्थांनी गुंतवणूक केलेली नसावी.
अशी कंपनी एकदा हाती लागली, की तिचा भाव दुप्पट, तिप्पट झाला म्हणून विकून टाकू नये. पहा पटतेय, का ही "संयमाची वाट' आणि त्यामुळे मिळणारी मधुर फळे!

Web Title: search multi baggers