अजय त्यागी आजपासून ‘सेबी’ची सूत्रे हाती घेणार

वृत्तसंस्था
बुधवार, 1 मार्च 2017

नवी दिल्ली: भांडवली बाजार नियामक 'सेबी'चे नवनिर्वाचित अध्यक्ष अजय त्यागी आजपासून मंडळाच्या कारभाराची सूत्रे हाती घेणार आहेत. यू.के. सिन्हा यांचे उत्तराधिकारी असलेले त्यागी पुढील तीन वर्षांकरिता सेबीचे कामकाज पाहतील.

अर्थ मंत्रालयाचे माजी अधिकारी असणाऱ्या त्यागी यांच्या नियुक्तीनंतर केंद्र सरकारने सेबीच्या अध्यक्षांचा कार्यकाळ पाच वर्षांऐवजी तीन वर्ष करण्याची घोषणा केली होती. सरकारने त्यागी यांचा कार्यकाळ कमी करण्यामागे कोणतेही कारण दिलेले नाही.

त्यागी हे हिमाचल प्रदेश केडरचे सनदी अधिकारी आहेत. आतापर्यंत ते आर्थिक कामकाज विभागात ते अतिरिक्त सचिव (गुंतवणूक) म्हणून काम पाहत होते. भांडवली बाजारविषयक प्रकरणे ते हाताळत होते. त्यागी हे काही काळ रिझर्व्ह बॅंकेच्या संचालक मंडळातही होते. सिन्हा यांना "सेबी'च्या अध्यक्षपदासाठी सहा वर्षांचा कार्यकाळ मिळाला होता. याआधी डी. आर. मेहता यांना अध्यक्षपदासाठी सर्वाधिक सात वर्षांचा कार्यकाळ मिळाला होता.

Web Title: Sebi’s new chairman Ajay Tyagi has to tackle challenges of the digital age