PNBHFL, Carlyle यांच्यातील करारावर सेबीची बंदी; काय होईल परिणाम?

SEBI
SEBI

सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) PNB Housing Finance कंपनीला मोठा झटका दिला आहे. PNB Housing Finance आणि Carlyle कार्लाइल ग्रुप यांच्यातील प्रस्तावित ४ हजार कोटींच्या करारावर सेबीनं आक्षेप घेतला आहे. सेबीच्या माहितीनुसार हा व्यवहार आर्टिकल ऑफ असोसिएशन (AOA) कायद्याच्या विरोधातील असल्याने त्यावर बंदी घालण्यात आली आहे. सेबीचं म्हणणं आहे की, कंपनीने त्यांच्या समभागांचं मूल्यांकन करणं गरजेचं आहे. (Sebi ban on PNB housing finance and Carlyle deal worth 4 thousand crore impact on investors)

SEBI
योगाभ्यासाचं मूळ नेपाळमध्ये भारतात नव्हे; पंतप्रधान ओलींचा दावा

PNB हाऊसिंग आणि कार्लाइल ग्रुपच्या ४ हजार कोटींच्या व्यवहाराच्या बातम्यांनंतर या कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळाली होती. सध्या PNB हाऊसिंग फायनान्स या कंपनीने सेबी आदेशाविरोधात Securities Appellate Tribunal म्हणजेच SAT मध्ये अर्ज केला आहे.

सेबीचा निर्णय लहान गुंतवणूकदारांच्या हिताचा

शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते सेबीचा हा निर्णय लहान गुंतवणूकदारांच्या हिताचा आणि योग्य वेळेस घेतला गेलेला निर्णय आहे. सेबीने PNB हाऊसिंग विरोधात केलेली कारवाई योग्य कारणांवरून केली गेली आहे. या करारानुसार PNB हाऊसिंग फायनान्स या कंपनीची 'प्रेफरंशियल शेअर इश्यू' च्या माध्यमातून भांडवल उभं करण्याची योजना आहे. मात्र, या व्यवहारात शेअर्स हे कंपनीच्या 'बुक व्हॅल्यू' पेक्षा कमी किमतीत विकले जाणार असल्याचं समजतंय. अशात कोणत्याही वित्तीय गृहनिर्माण कंपनीच्या मूल्यांकनाचे मापदंड हे तिच्या 'बुक व्हॅल्यू' नुसार ठरत असतात. अशात प्रश्न असा उपस्थित होतो की कंपनी आपल्या बुक व्हॅल्यू खाली शेअर्स कशाला विकते आहे. यामध्ये लहान भागधारकांचा काहीही शोध नाही. म्हणूनच अशा परिस्थितीत स्वतंत्र मूल्यांकन केल्यावर अधिक स्पष्टता येऊ शकेल. म्हणूनच सध्या हा लहान गुंतवणूकदारांच्या हिताचा असल्याचं मार्केट मधील तज्ज्ञ सांगतात.

SEBI
सरनाईकांच्या 'लेटरबॉम्ब'नंतर महाविकास आघाडीची मंगळवारी बैठक

पीएनबी हाऊसिंग आणि कार्लाईल ग्रुपमधील कराराची बातमी मिळताच PNB च्या शेअर्समध्ये कमालीची तेजी दिसून आली. या बातमीमुळे बाजारात अशी भावना निर्माण झाली होती की, PNB हाऊसिंग सारख्या कंपनीत कार्लाइल ग्रुप सारखे मोठे प्रमोटर असतील. मात्र, आता सेबीच्या या निर्णयानंतर पुन्हा एकदा शेअरच्या किंमतीत घसरण पाहायला मिळतेय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com