सेबीचा रतन टाटांना दिलासा

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जानेवारी 2017

मुंबई : टाटा समूहातील काही कंपन्यांमध्ये इन्सायडर ट्रेडिंग झाल्याच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याने भांडवली बाजार नियंत्रक सेबीने रतन टाटांना दिलासा दिला आहे. सायरस मिस्त्री यांच्यावतीने टाटा समूहातील काही कंपन्यांमध्ये इन्सायडर ट्रेडिंग झाल्याची तक्रार सेबीकडे करण्यात आली होती.

यासंदर्भात नुकताच सेबीच्या संचालकांची बैठक झाली. यात मिस्त्रींच्या तक्रारीवर चर्चा करण्यात आली, मात्र त्यात काही तथ्य आढळून आले नसल्याने सेबीकडून टाटांना क्‍लीनचीट मिळण्याची शक्‍यता आहे. रतन टाटा यांनी टाटा समूहाच्या महत्वाच्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप केला. एखाद्या कंत्राटातील संवेदनशील माहिती मागवून निर्णयांमध्ये ढवळाढवळ केल्याचा आरोप मिस्त्रींकडून करण्यात आला होता. मात्र रतन टाटा समूहाचे मानद अध्यक्ष असून त्यांची ही कृती योग्य आहे.

कंपनीचे संचालक मंडळ टाटांकडून सल्ला घेऊ शकतात. मानद अध्यक्ष म्हणून कंपनीची कामगिरी, अधिग्रहण, विलीनीकरण, निर्गुंतवणूक याबाबतची माहिती घेऊ शकतात, असे सेबीच्या बैठकीनंतरच्या इतिवृत्तात म्हटले आहे.

Web Title: sebi gives relief to ratan tata