भांडवली बाजारावर सेबी, रिझर्व्ह बॅंकेचे लक्ष 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

मुंबई - भांडवली बाजारातील घडामोडींवर बारीक लक्ष असून, गरज पडल्यास कारवाई करू, असे भांडवली बाजार नियंत्रक संस्था ‘सेबी’ आणि रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी (ता.२१) झालेल्या मोठ्या आपटीने घबराट निर्माण झाली होती. त्या पार्श्‍वभूमीवर ‘सेबी’ आणि रिझर्व्ह बॅंकेने गुंतवणूकदारांना आश्‍वस्त केले. शेअर बाजारातील अस्थिरता आणि शुक्रवारीच्या घडामोडींसंदर्भात ‘सेबी’ने मुंबई शेअर बाजाराकडून विस्तृत अहवाल मागवला आहे. काही सेकंदांत झालेल्या ११०० अंशांच्या घसरणीमागे कोणते घटक कारणीभूत आहेत, याबाबत ‘सेबी’कडून चौकशी केली जाण्याची शक्‍यता आहे.

मुंबई - भांडवली बाजारातील घडामोडींवर बारीक लक्ष असून, गरज पडल्यास कारवाई करू, असे भांडवली बाजार नियंत्रक संस्था ‘सेबी’ आणि रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी (ता.२१) झालेल्या मोठ्या आपटीने घबराट निर्माण झाली होती. त्या पार्श्‍वभूमीवर ‘सेबी’ आणि रिझर्व्ह बॅंकेने गुंतवणूकदारांना आश्‍वस्त केले. शेअर बाजारातील अस्थिरता आणि शुक्रवारीच्या घडामोडींसंदर्भात ‘सेबी’ने मुंबई शेअर बाजाराकडून विस्तृत अहवाल मागवला आहे. काही सेकंदांत झालेल्या ११०० अंशांच्या घसरणीमागे कोणते घटक कारणीभूत आहेत, याबाबत ‘सेबी’कडून चौकशी केली जाण्याची शक्‍यता आहे. बिगर बॅंकिंग वित्त कंपन्यांच्या समभागामधील घसरणीची रिझर्व्ह बॅंकेनेही गंभीर दखल घेतली आहे. चलन बाजारात रुपयाची डॉलरसमोर होणाऱ्या पडझडीचे भांडवली बाजारावर पडसाद उमटत आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेकडून हस्तक्षेप केला जाण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sebi Reserve Bank Watch on Capital Market