Stock Market: आजपासून शेअर बाजारात नवीन बदल; सेबीचा महत्वपूर्ण निर्णय

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 26 November 2020

रतीय भांडवली बाजार नियामक सेबीने संचालक मंडळाच्या बैठकीपूर्वी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली: भारतीय भांडवली बाजार नियामक सेबीने संचालक मंडळाच्या बैठकीपूर्वी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रोखे बाजारात पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. सेबीने रोखे बाजारातील नॉन F&O (Future and Options) शेअर्सचे वाढीव मार्जिन काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

देशात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात बाजारावर जास्त दबाव असताना सेबीने रोखे बाजारासाठी वैयक्तिक शेअर्सवरील मार्जिन वाढवण्याचा निर्णय घेतला होता. हे सर्व नियम आता मागे घेण्यात आले आहेत. पण वायदे व्यापारासाठी करण्यात आलेली काही वाढ अजूनही कायम राहील.

अमेरिकेची अर्थव्यवस्था येतेय रुळावर; जागतिक अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक संकेत

20 ते 40 टक्के मार्जिनचा निर्णय मागे-
CNBC आवाजने ट्विट करून ही माहिती दिली आहे. बाजार नियामक SEBIने कॅश शेअर्समध्ये मार्जिन नियमांमध्ये सवलत दिली आहे. या शेअर्समधील 20 ते 40 टक्के मार्जिन काढून घेण्यात आले आहे. 

आता ट्रेडिंगचा नियम बदलेल-
मार्जिन कमी करणे म्हणजे लोक आता अधिक व्यापार करू शकतील आणि त्यांच्या मर्यादाही किंचित वाढतील. याशिवाय मिडकॅप आणि स्मॉलकॅप स्टॉकमधील तरलताही (liquidity) अधिक चांगली राहील.

काउंटरवर बुक केलेलं तिकीटही करता येणार रद्द

आजपासून नियम बदलले-
कॅश शेअर्सच्या वाढीव मार्जिनबाबत मोठा निर्णय घेऊन सेबीने (SEBI) रोखे बाजारातील नॉन F&O चे मार्जिन काढलं आहे. हे नवीन नियम 26 नोव्हेंबरच्या मार्केट क्लोसींगपासून लागू होतील. यापूर्वी 20 मार्चपासून कॅश शेअर्सवर मार्जिन वाढवण्यात आले आणि अनेक टप्प्यांमध्ये ते 40 टक्क्यांपर्यंत मार्जिन करण्यात आलं होतं. यामध्ये 20 टक्के सर्किट असलेल्या शेअर्समध्ये अधिक मार्जिन होते, पण आता बाजारपेठेच्या फिडबॅकनंतर सेबीने हा महत्वाचा निर्णय घेतला.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sebi withdraws increase in margin of non future and options