सेबीकडून आयपीओमध्ये बोली लावण्याचे नियम कडक, 1 सप्टेंबरपासून लागू होणार...

सबस्क्रिप्शन डेटा वाढवण्यासाठी आयपीओमध्ये बोली लावण्यावर बंदी घातली जाणार आहे.
sebi
sebisakal

सेबीने (SEBI) आयपीओमध्ये बोली लावण्याचे नियम कडक केले आहेत. आता सबस्क्रिप्शन डेटा वाढवण्यासाठी आयपीओमध्ये बोली लावण्यावर बंदी घातली जाणार आहे. म्हणजे ज्या गुंतवणुकदारांना कंपनीचे शेअर्स खरेदी करायचे आहेत तेच इश्यूमध्ये (IPO) बोली लावू शकतील. हा नवीन नियम 1 सप्टेंबरपासून लागू होणार आहे.
काही संस्थात्मक गुंतवणूकदार (Institutional Investors) आणि दिग्गज गुंतवणूकदार (High Net Worth Individuals) केवळ IPO चे सबस्क्रिप्शन वाढवण्यासाठी बोली लावत असल्याचे सेबीला कळाले होते. इश्यूद्वारे शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा त्यांचा हेतू नव्हता.

sebi
LIC च्या 'आयपीओ'विरुद्ध कर्मचाऱ्यांची सेबी कडे तक्रार

बाजार नियामकाने (Market Regulator) सोमवारी यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. गुंतवणूकदारांच्या बँक खात्यात आवश्यक निधी उपलब्ध झाल्यावरच IPO साठी अर्जाची प्रक्रिया केली जाईल, असे त्यात म्हटले आहे. स्टॉक एक्स्चेंज त्यांच्या इलेक्ट्रॉनिक बुक बिल्डिंग प्लॅटफॉर्मवर (ASBA) तेव्हाच अर्ज स्वीकारतील जेव्हा ऍप्लिकेशन मनी ब्लॉक झाल्याचे कन्फर्मेशन असेल.

हा नियम सर्व कॅटेगरीमधील गुंतवणूकदारांना लागू असेल, असे सेबीने म्हटले आहे. IPO मध्ये बोली लावण्यासाठी किरकोळ (Retail), पात्र संस्थात्मक खरेदीदार (QIBs), गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार (NIIs) यांसारख्या कॅटेगरी आहेत.

sebi
सेबी यंग प्रोफेशनल प्रोग्राममध्ये नोकऱ्या! पगार 60 हजार

1 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या सर्व आयपीओंना नवीन नियमाचे पालन करावे लागेल. सध्या, ASBA च्या आधारे सर्व कॅटेगरीमधील गुंतवणूकदारांचे फंड ब्लॉक केले जातात. पण, व्यवहारात, QIB आणि NII कॅटेगरीमधील गुंतवणूकदारांसाठी काही प्रमाणात सूट आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com